मंडळी १९५१ साली जेव्हा स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक झाली होती. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्या निवडणूकीमध्ये पराभव झाला होता. नंतर त्यांना एका पत्रकाराने जेव्हा प्रश्न विचारला की, मिस्टर आंबेडकर आपला या नुकत्याच झालेल्या निवडणूकीमध्ये झालेला जो पराभव आहे, त्यावर आपलं काय म्हणणं आहे?
पत्रकाराच्या या प्रश्नाच उत्तर देताना डॉ. आंबेडकर तेव्हा म्हणाले की,
” आज माझ्या भारतीय देशातील जनतेने या देशाच्या लोकशाहीची ताकद संपूर्ण देशाला दाखवून दिली आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे.”
मात्र मंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण आणि आताच्या राजकीय नेत्यांचं राजकारण पाहता फार मोठी तफावत दिसून येते. महाविकास आघाडी सरकार आणि विरोधीपक्ष सर्वे एकमेकांचे पाय ओढण्याच्या मागे लागलेले आहेत. सतत एकमेकांची टीका करणे, टिंगल टवाळी करणे, विचारपीठावर बोलत असतांना विरोधी पक्षाच्या नेत्यांची नक्कल करणे. या सर्व गोष्टी सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये चालू आहे.
एकीकडे महाविकास आघाडी सरकार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर ईडीची चौकशी पाठवतात. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल केंद्र सरकार महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडीची चौकशी पाठवतात. नंतर हाच विषय सतत चर्चेत चालू असतो.
महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रतिदिवस दोन शेतकरी आत्महत्या करतात. याकडे सरकारच लक्ष नाही. एसटी कामरच्याऱ्यांचं त्यांच्या हक्कासाठी गेली कित्येक महिने आंदोलन चालू आहे. ज्यामध्ये अनेक एसटी कर्मच्याऱ्यांनी स्वतःचा जीव गमावला, तरी या सरकारला जाग आली नाही. विरोधी पक्षाने किरीट सोमय्याला फक्त महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची अवैध संपत्ती शोधण्यासाठी कामाला लावलं आहे.
पण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांच्या प्रश्नांसाठी कधीच विरोधीपक्षाला बोलायचं नसत. जिकडे तिकडे फक्त ‘याला आडव त्याची जिरव’ नुसता हाच प्रकार चालू आहे. म्हणून आता जनतेने सतर्क होण्याची वेळ आली आहे. जनतेच्या जीवाची निलामी करणाऱ्या या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवून देणं हे जनतेच्या हातामध्ये आहे. म्हणून सावधान रहा.