मंडळी विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या ३० जानेवारी २०२३ ला होणार असून पदवीधरांमध्ये कमालीचा उत्साह या निवडणुकीबद्दल बघायला मिळतो आहे.
याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमरावती पदवीधर मतदार संघात चालू असलेली उलथापालथ. होय मंडळी. अमरावती मतदार संघामध्ये एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसकडून धीरज लिंगाडे.
भारतीय जनता पक्षाकडून अमरावती पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. रंजित पाटील आणी वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. डॉ. अनिल अमलकार यांनां उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या निवडणुकीत एकूण २३ उमेदवार जरी रिंगणात उतरले असले, तरी लढत मात्र भाजप,काँग्रेस आणी वंचित बहुजन आघाडीमध्ये होणार असल्याची चर्चा सगळीकडे होत आहे.
वंचितच पारड जड का?
मंडळी विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ट्वीस्ट आला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर.
यामध्ये महत्वाची बाब अशी की वंचितने उमेदवार म्हणून ओबीसी समाजाचे कर्तव्यदक्ष व्यक्ती प्रा. डॉ. अनिल अमलकार यांना पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी डॉ. अमलाकर यांचा पदवीधरांसाठीचा संघर्ष आणी जनसंपर्क पाहता कार्यकर्तुत्वाच्या बळावर त्यांना ही उमेदवारी दिली आहे.
मात्र प्रा. डॉ. अनिल अंमलकार यांनां उमेदवारी मिळताच महाविकास आघाडी आणी भाजपमध्ये चिंतेच वातावरण पसरलेलं आहे. कारण डॉ. अनिल अंमलकार हे गेल्या ३० वर्षांपासून सर्वसामान्य लोकांचे, विद्यार्थ्यांचे आणी पदवीधरांचे प्रश्न घेऊन समाजासाठी काम करत आले आहे.
डॉ. अमलकार हे मूळ खामगावं येथील रहिवासी असून अकोला, अमरावती, वाशीम ,बुलढाणा आणी यवतमाळ जिल्ह्यातील पदवीधरांसोबत त्यांचा कमालीचा संपर्क येत असल्याने सर्वीकडे त्यांचं पारड जड असल्याची चर्चा सध्या अमरावती पदवीधर मतदार संघात सुरु आहे.
याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अकोला येथील जिल्हापरिषद विश्राम गृहात नुकत्याच पार पडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीतील पदवीधरांची गर्दी डॉ. अनिल अंमलकार यांना पहिली पसंती दर्शवत आहे.
डॉ.अमलकार यांनी आपल्या विजयाच रनशिंग फुंकलं असून अमरावती, अकोला , वाशीम , बुलढाणा, यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमध्ये त्यांची निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. ज्यामध्ये पदवीधरांची गर्दी आणी त्यांचा उत्साह डॉ. अंमलकार यांना विधानपरिषदेमध्ये पाठवण्यासाठी सज्ज आहे.