पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान धारणा आणि चिंतना मागे त्यांचा राजकीय डाव आहे का?
लोकसभा निवडणुकीचा ०१ जूनला सातवा टप्पा पार पडणार आहे आणि हा या लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असणार आहे. या टप्प्यात आठ राज्य आणि केंदरशासित प्रदेशांमधील एकूण ५७ लोकसभा मतदारसंघासाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तत्पूर्वी ३० मे ला या टप्प्यातील प्रचार थांबवण्यात आले असून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
गेल्या ०२ ते ०३ महिन्या पासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत होते. ३० मे ला शेवटच्या टप्यातल्या मतदारसंघांत आचारसंहिता लागू झाली आणि प्रचार थांबताच पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यान धारणा करणारं असलायच्या चर्चा रंगल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल इथे ४८ तास ध्यान धारणा आणि चिंतन करणार आहेत. त्यांची ध्यान धारणा ०१ जूनला दुपारी ०३ वाजेपर्यंत चालणार असल्याचं बोललं जातं आहे. नरेंद्र मोदी ३० तारखेलाच कन्याकुमारीत पोहचले होते त्यानी स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियला भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ध्यान धारणेला विरोधक विरोध करत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आचार संहितेचे उलंगण करत असल्याचे आरोप केले जात आहेत. त्याच बरोबर विरोधी पक्षानी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे.
आचार संहिता लागू झाल्या नंतर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रचार करण्यास बंदी असते परंतू नरेंद्र मोदी ध्यान धारणा करत असल्यामुळे चर्चेत आले आहेत आणि त्यांच्या या ध्यान धारणेमागे राजकीय खेळी आहे असे विरोधकांचे मत आहेत.
२०१४आणि २०१९ मध्ये सुध्दा नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्या नंतर चर्चेत राहिले होते. २०१४ मध्ये त्यांनी प्रचार संपल्या नंतर प्रतापगड ला भेट दिली होती आणि २०१९ मध्ये प्रचार संपल्या नंतर मोदींनी केदारनाथला जाऊन ध्यान धारणा केली होती.
परंतू या वेळी नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी हे ठिकाण ध्यान धारणेसाठी निवडले आहे. या मागे त्यांची राजकीय खेळी असल्याचं बोलले जात आहे. ०७ व्या टप्प्यातील मतदारसघांत पश्चिम बंगालमधील ०७ जागा साठी मतदान होत आहेत आणि स्वामी विवेकानंद यांची जन्म भूमी आणि कर्मभूमी म्हणून पश्चिम बंगाल ओळखले जाते. त्यामुळे मोदींनी स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यान धारणा करून पश्चिम बंगाल मधीले मतदान आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.
मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनी पश्चिम बंगाल मधून १८ जागा जिंकल्या होत्या या वेळेस ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार असा भाजपनी नारा दिला आहे. त्यामुळें पश्चिम बंगाल भाजप साठी खूप महत्त्व पूर्ण राज्य आहे.
त्याच बरोबर कन्याकुमारी हे भारताचे दक्षिण टोक आहे दक्षिणेकडे भाजपला अत्ता पर्यंत हवे तसे यश मिळाले नाही म्हणुन दक्षिणेत भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी मोदींनी कन्याकुमारी हे ठिकाणं ध्यान धारणा करण्यासाठी निवडले असल्याचे सुद्धा काही लोक बोलत आहेत.
नरेंद्र मोदी हे हिंदू मुस्लीम धर्मावर राजकारण करतात. स्वामी विवेकानंद हे हिंदू धर्माचे समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. नरेंद्र मोदी यांनी हिंदु धर्मिय मतदरा सोबत धार्मिक राजकारण करून आपल्याकडे आकर्षित करण्याससाठी कन्याकुमारी हे ठिकाण ध्यान धारणा करण्यासाठी निवडले आहे असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. असे विविध मत जरी असले तरी यात किती तत्थे आहे यावर शंका आहे.
तुम्हाला काय वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान धारणा आणि चिंतन करण्या मागे त्यांचा राजकीय डाव आहे का तुमचे मत कळवा.