सत्तेतला भस्मासुर ओळखणे गरजेचे – बेधुंदकार गोविंद पोलाड ( प्रवक्ता संभाजी ब्रिगेड नागपूर महानगर)

संभाजी ब्रिगेड

मंडळी या लेखाच शीर्षक वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढे लांब केस वाढवलेला, डोक्यावर शिंग असलेला, कपाळावर मोठा टिळा लावलेला आणि जोरजोरात हसून धोका दर्शवणारा एक भयानक चेहरा उभा राहला असेल.

 

ज्याला आपण एकंदरीत राक्षस म्हणतो. ज्याने भगवान शंकराची घोर तपश्चर्या करून त्यांना वरदान मागितल होत, की मी ज्या वस्तू किंवा प्राण्यावर हात ठेवेल ती भस्म व्हायला हवी आणि मग त्या राक्षसाच नाव भस्मासुर अस पडल.

 

पण आश्चर्य अस की,हे वरदान प्राप्त करण्यासाठी ज्या महादेवाची त्याने तपश्चर्या केली होती, त्याच महादेवाला भस्म करण्याचा प्रयत्न या भस्मासुराने केला होता अस आपण विविध दैविक मालिकांमध्ये बघत असतो. 

 

बाळासाहेब ठाकरेंनी सोनू निगम ला मारण्यासाठी का पाठवले होते शिवसैनिक? निलेश राणेंनी केला होता आरोप.

 

मंडळी सांगायच तात्पर्य अस, की भस्मासुर नावाचा हा राक्षस दैवी काळामध्ये जरी मारल्या गेला असला तरी तो दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या आमच्या आजूबाजूला आजही रुप-वेश बदलून वावरत असतो.

 

हे भस्मासुर कित्येक काळ जनता नावाच्या ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी घोर तपश्चर्या करत असतात आणि मग हा ईश्वर त्यांच्यावर मतदानाच्या दिवशी प्रसन्न होऊन त्याला वरदान देतो.

 

मग तपश्चर्या करणाऱ्या त्या व्यक्तीतला भस्मासुर जागा होतो आणि सतत पाच वर्षे तो इथल्या ईश्वर नावाच्या जनतेला दगा देऊन भस्म करत असतो.

 

प्रबोधनकारांचे कुळ की पुरंदरेचे गोत्र? – गंगाधर बनबरे ( संभाजी ब्रिगेड)

 

कधी तो शेतकऱ्यांच्या मालाचे भाव घसरवतो, कधी विद्यार्थ्यांच्या ऐन वेळेवर परीक्षा रद्द करतो , कधी तो ऐन रात्री नोटबंदी करून देशातील जनतेला तासन्तास बँकेच्या रांगेमध्ये उभं करून १४३ लोकांचे जीव घेतो,

 

कधी ऐन वेळी लॉकडाऊन जाहीर करून परराज्यातील लोकांना हजारो मैल पायदळ चालण्यास भाग पाडतो तर कधी शेतकऱ्यांवर बळजबरीने कानून-कायदे लादून त्यांच्यावर हल्ले करून दिल्लीमध्ये रस्त्यावर स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलन करायला लावतो

 

आणि मग त्यांना ‘आंदोलनजीवी’ , खलिस्तानी, पाकिस्तानी म्हणायला लागतो तेव्हा मला इथल्या सरकार मध्ये, इथल्या गप्प बसून पगार घेत असलेल्या नेत्यांमध्ये भस्मासुर दिसून येतो. 

 

मंडळी आपण प्रत्येकाने आपापल्या आजूबाजूला फिरणारे भस्मासुर लक्षात घेणे गरजेचे आहे. तो नेत्यांमध्ये किंवा सरकारमध्येच आहे असेही नाही.

 

स्त्रियांना प्रेमाच्या नावाखाली प्रभावित करून तिच्या इच्छेविरुद्ध तीच शारीरिक शोषण करणाऱ्यांमध्ये किंवा बलात्कार करणाऱ्यांमध्ये भस्मासुर आजही जिवंत आहे.

 

तुमच्याशी गोडगोड बोलून स्वतःच काम झाल्यानंतर पाठ फिरवणाऱ्याध्ये भस्मासुर जिवंत आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या आजूबाजूचे भस्मासुर ओळखा आणि स्वतःला भस्म होण्यापासून वाचवा.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *