१ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास

जयललिता

मंडळी राजकीय क्षेत्राच्या इतिहासामध्ये काही असे राजकीय नेते होऊन गेलेत की त्यांची कारकिर्द बघितली तर अक्षरशः हवालदिल झाल्याशिवाय राहणार नाही. यापैकीच एक राजकीय नेत्या तामिळनाडूच्या अम्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयललिता.

 

जयललिता यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४८ रोजी मेलुकोटे येथे तमिळ कुटुंबात झाला. त्या दोन वर्षांच्या असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आईनेच त्यांचं पालनपोषण केलं.

 

२००३च्या महाबळेश्वर अधिवेशनात अस काय घडलं की ठाकरे घराण्यात फूट पडली?

 

जयललिता यांच्या आईंना त्यांना वकील नाहीतर नृत्यनायिका करायचे होते. मात्र त्यांच्या नशीबामध्ये काही वेगळंच लिहिलेलं होत. जयललिता यांनी भरतनाट्यम, मोहिनी अट्टम यांसारख्या अनेक नृत्यप्रकाराचेही प्रशिक्षण घेतले.

 

आणि त्या अभेनेत्री झाल्या. जयललिता यांनी अनेक तामिळ चित्रपटात काम केले आणि अवघ्या काही कालावधीतच त्यांनी रसिकांची लोकप्रियता स्वतःकडे खेचून आणली होती.

 

त्यानंतर त्यांनी १९८२ मध्ये एम. जी. रामचंद्रन यांच्या एआयएडीएमके या पक्षात प्रवेश घेऊन आपली राजकारणामध्ये दावेदारी मजबूत केली. जयललितांनी नंतर राजकीय क्षेत्रामध्ये कधीच मागे वळून बघितलं नाही.

 

“इंदिरा गांधींकडे जाऊ नका” पवारांनी यशवंतराव चव्हाणांना दिला होता सल्ला?

 

१९८४ ते १९८९ या कालावधीमध्ये त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. मात्र रामचंद्रन यांच्या निधनानंतर एआयएडीएमकेमध्ये फूट पडली आणि रामचंद्रन यांच्या पत्नीचा एक गट व जयललिता यांचा एक गट असे दोन गट निर्माण झाले.

 

१९८९ मध्ये त्या तामिळनाडू विधानसभेतील पहिल्या विधानसभा महिला विरोधीपक्षनेत्या होत्या.

 

पहिली महिला मुख्यमंत्री

 

काही कालावधीनंतर एआयएडीएमके पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले आणि सर्वानुमते त्या १९९५ साली तामिळनाडूच्या सर्वात कमी वय असलेल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या.

 

जयललिता यांना विधानसभा सभागृहात काही आमदारांकडून मारहाणही झाली होती. आणि फाटक्या साडीत त्या सभागृहाच्या बाहेर पडल्या होत्या. या घटनेने जयललिता यांना जनतेकडून मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाली होती.

 

त्यांच्या राजकीय जीवनात अनेक चढ उतार आले पण त्या कधीच खचल्या नाही. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदींची लाट येऊनसुद्धा तामिळनाडूमध्ये त्यांनी ३९ पैकी ३७ जागांवर विजय मिळवला होता.

 

मुख्यमंत्री असतांना त्यांनी फक्त १ रुपया पगार घेऊन उत्तम प्रशासकाच उदाहरण दिलं. अखेर वयाच्या ६८ व्या वर्षी म्हणजेच ५ डिसेंबर २०१६ ला तामिळनाडूमधील चेन्नई येथे अम्मानी जगाचा निरोप घेतला.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *