किरीट सोमय्या यांना १७२ कम्पन्यांनी पैसे दिले – संजय राऊत

किरीट सोमय्या

मंडळी एकीकडे महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सगळीकडे चर्चा चालू आहे, तर दुसरीकडे राणा दाम्पत्य आणि शिवसेनेमध्ये जोरदार राजकीय लढाई सुरू आहे. असाच काही वाद आता नेहमीप्रमाणे भाजपा नेते आणि संजय राऊत यांच्यामध्ये पुन्हा पेटलेला आहे.

 

किरीट सोमय्या यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती आणि त्यांनतर त्यांच्यावर ईडीची चौकशी लावण्याच कामसुद्धा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते. प्रतिउत्तरात भारतीय जनता पक्षानेसुद्धा संजय राऊत यांच्यावर ईडीची चौकशी केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून आणली होती.

 

माझ्यावरील हल्ल्यामध्ये पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुंडांना साथ – किरीट सोमय्या

 

ही भाजप नेते किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात चालू असलेली राजकीय लढाई संपण्याच नाव घेत नाही आहे. संजय राऊत यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलत असताना किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका करत म्हटलं की,

 

” किरीट सोमय्या हे खंडणीखोर आहे. त्यांनी युवक प्रतिष्ठानच्या नावावर कोट्यावधी रुपये जवळपास १७२ कंपन्यांकडुन घेतले आहेत आणि या प्रतिष्ठानमध्ये बाहेरचे लोक कुणीच नसून त्यांच्या कुटुंबातील लोक सामील आहे.”

 

अस संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले. 

 

माझ्या मालमत्ता जप्तीची बातमी मी टीव्हीवर बघितली- संजय राऊत

 

किरीट सोमय्यांची सगळी प्रकरण बाहेर काढू – संजय राऊत

 

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका करताना संजय राऊत पुढे म्हणाले की,

 

” ते महाशय पोलीस स्टेशनमध्ये आमची तक्रार करायला गेले होते. मात्र आम्ही त्यांची सगळी प्रकरण बाहेर काढू.”

 

अस संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *