१ जानेवारी २०१८ कोरेगाव-भीमा येथे पेटलेली भयाण जातीय दंगल…
हातामध्ये लाठ्या घेऊन धावणारं वर्दळ , जखमी झालेल्या अवस्थेत माणसं , पोलीस, संरक्षण दलाला शांततेसाठी करावया लागणारी कसरत सर्व भयावह होते..
त्या नंतर राज्यभरात या दंगल बद्दल जातीय दृष्टीने ,वेगवेगळ्या पैलुने बघायला सुरुवात झाली..
” कोरेगाव दंगल हा एल्गार परिषदेचा दुष्परिणाम असून सीबीआयची पूर्वतयारी आणि एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे त्यात निष्पन्न झाले होते, असे याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन दोषारोप पत्रांमध्ये नमूद आहे. “
रस्ते, शोषखड्डे, बसस्टॉप बांधणे विकास नाही. रोजगार द्या. – बेधुंदकार गोविंद पोलाड
आणि त्या नंतर वेगवेगळ्या राजकीय पक्ष, नेते आणि त्यांचे वेगवेगळे आरोप, प्रत्यारोपण ला सुरुवात झाली आणि अश्यातच राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं स्टेटमेंट आलं..
” संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमामध्ये वेगळ वातावरण तयार केलं !! ”
शरद पवार यांची राजकीय उंची देशभरात सर्वांना माहीत आहेच म्हणून त्यांनी दिलेले स्टेटमेंट सुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरले…
अॅड.प्रकाश आंबेडकर यांंनी सूद्धा यास समर्थन दर्शवत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले..
मिलिंद एकबोटे यांना अटक सुद्धा करण्यात आली.
पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये
याच दंगलीत श्री शिवछत्रपतींचे चित्र असलेले कपडे घातल्या मुळे राहुल फटांगळे या युवकाची घेराव घालून जीवघेणा हमला करण्यात आला ज्याची यामध्ये मृत्यू झाली या मध्ये तिघांना अटक सुद्धा करण्यात आली पण त्यांची नावे मात्र पोलिसांनी पुढे केली नाही !!
एकंदरीत २०१८ ते २०२२ पर्यंत आजतोवर या दंगली बद्दल कोर्टात निर्णय सुरू आहे…
पण या एवढ्या कालावधी नंतर संभाजी भिडे यांच्या विरोधात एकही पुरावा न मिळाल्या मुळे त्यांचे आरोपपत्र रद्द झाले…
आणि अश्यातच शरद पवार यांनी आपल्या जुन्या वक्तव्यावरून सरळ पलटी मारली..
मला भिमा कोरेगाव दंगल बद्दल पुर्णतः माहिती नाही आणि मी संभाजी भिडे आणि एकबोटे परस्पर ओळखत नाही..
तर विषय असा आहे की, जेव्हा पवार साहेबांना या बद्दल काही माहिती नव्हती, कल्पना नव्हती तर मग सरळ आरोप कुठल्या बेसीस वर केले होते ?
जेव्हा तिथे स्थानिक पातळीवर काय झाले याची कल्पना त्यांना नव्हती तर मग एखाद्या व्यक्ती वर सरळ आरोप का केल्या गेले ?
आपण एका मोठ्या पक्षाचे सर्वेसर्वा आहे !! आपल्या स्टेटमेंट ने काय पसरु शकते याची जाणीव सुद्धा या एवढ्या मोठ्या माणसाला नसावी का ? त्या नंतर राज्यात जे काही झाले याला जिम्मेदार कोण होते?
आणि राहुल फटांगळे च्या हत्या चे आरोपी पुढे का आणल्या गेले नाही, आणि त्यांचे पुढे काय झाले या बद्दल कोणी काही का बोलले नाही ??
कसे आहे न , की दंगलीत मरणारा हा राजकारणी नसतो , असतो तो सामान्य म्हणून राजकारण्यांनी काहीही वावगं बोलुन सामान्य माणसाच्या जीवनाचे हाल करु नये एवढेच…
✍🏻 अक्षय चंदेल ©
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- सौरव गांगुली करणार भाजपमध्ये प्रवेश
- राज ठाकरेंना उत्तर भारतीयांची माफी मागीतल्याशीवाय अयोध्येत पाय टाकू देणार नाही – भाजप खासदार
- शरद पवारांना आम आदमी पक्षाच पत्र
- भाजप देशात विषारी वातावरण पसरवत आहे- शरद पवार
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir