#आझाद हु मै……
हम चले मौत को गले लगाने हिंद वतन के परवाने..!!
इश्क मे रंग के रंगे हुए हम आझादी के दिवाने..!!
१२ मार्च १९३० मिठावर लागलेल्या करीच्या विरोधात महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाने स्वदेशी ची आगळीवेगळी लाट उभी केली..
भारताच्या इतिहासात आझादीचा वणवा पेटला होता..
भारताच्या स्वतंत्रयुद्धाच्या निर्णायक समराची ही सुरुवात होती…
अहिंसा आणि सशस्त्र या दोन्ही क्रांतींनी ब्रिटीशांच्या नाकीनऊ आणले होते…
भारतीय क्रांतिकारकांच्या विरोधात ब्रिटिशांच्या मनात आग लागलेली होती…
त्यातल्या त्यात अनेक क्रांतिकारकांची धरफकड होत नव्हती…
भगतसिंग, जतीन दा , सुखदेव, राजगुरू, यान सारखे असंख्य क्रांतिकारकांची फौज उभे करणारे चंद्रशेखर आझाद हा मुक्त होते आणि त्यांना पकडणे ब्रिटिशांना सर्वात महत्त्वाचे झालेले….
२७ फेब्रुवारी १९३१
क्रांतिकारकांच्या अग्रगणी चंद्रशेखर आझाद यांच्या कार्यात थोडी सुद्धा विश्रांती नव्हती.
भगतसिंग यांच्या कैदैनंतर आणि उपोषणाने क्रांतीची लाट उभी केली…
एक नैतृत्व कसे असावे याचे उदाहरण म्हणजे चंद्रशेखर आझाद..
आपले यांना भेटण्यासाठी चंद्रशेखर अल्फ्रेड पार्क मध्ये आलेले….
ब्रिटिशांना हा आझाद कधीच पकडता आला नाही… हा आझाद म्हणजे ब्रिटिशांच्या डोळ्यात सलणारा अफ्ताब होता…
म्हणून ब्रिटीशांनी आपली चाल टाकली..
फितुरीच्या काळोखाला हाताशी धरून स्वतंत्रसूर्याला कैद करण्यासाठी अल्फ्रेड पार्क ला ब्रिटीशांनी घेराव केला…
आणि धाड धाड करत गोळीबार सुरू झाला…
त्याचं प्रत्युत्तर सुद्धा आझाद तेवढ्याच तडाख्यात देत होते.. आझादांची बंदुकीची प्रत्येक गोळी ब्रिटिशांना मारत सुटली पण नियतीने आपला फेर फिरवला…
आझादांकडे शेवटची एकच गोळी उरली…
काय करावे?? शरणागती पत्करावी??
नही !!! हम आझाद है और आझाद ही रहेंगे….
आझादांनी आपल्या मातृभूमीची माती मस्तकावर लावली…
त्या मातीत आझादांच्या डोळ्यातील अश्रूचा एक थेंब एकरूप झाला…
” माफ करदेना ए वतन , तुझे आझाद करने का ख्वाब अधुरा रह गया !!! पर मै आझादी की लौ बनकर जिंदा रहुगा हमेशा !! “
आणि धाड्ड….ड्ड…..ड्ड……
गोळी चालली…
आझादांनी स्वतःच्या हातातील बंदुकीने आपल्या जिवनाचा शेवटचा नारा बनवला…
डोक्यातून रक्ताची धार निघाली…
भेदक नजरा तश्याच उघड्या रोखून
खुश रहो ए वतन म्हणत….
शब्द थांबले , श्वास रोखून , आपल्या जन्मभूमीला मुक्त करण्याची स्वप्न असंख्य क्रांतिकारकांच्या ह्रदयात पेटवून आझादी आझाद शेवट करून निघाले ..
आझादांनी बलिदान दिले आणि एका अभेद्य क्रांतिचा शेवट झाला….
✍🏻अक्षय चंदेल©
#जिगरे
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir