मंडळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोलमडून पडलं आणि फडणवीस-शिंदे सरकार स्थापन झालं.
या कृत्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाज माध्यमांवर चांगलीच टीका केली होती. मात्र सध्या सोशल मीडियावर अमोल मिटकरी यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुरवात झाली…
या व्हिडीओमध्ये मिटकरी हे एकनाथ शिंदे यांच्या चक्क पाया पडतांना दिसत आहे. ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्या जात आहे.
आपल्याला माहिती असेल की अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याअगोदर महाराष्ट्रात बहू चर्चित असणाऱ्या संभाजी ब्रिगेड या पक्षाचे पदाधिकारी होते. त्यांना याच पक्षाने व्याख्यानाकरिता कार्यक्रम उपलब्ध करून दिले.
ज्यामाध्यमातून मिटकरींनी आपली चांगलीच छाप राजकारणामध्ये सोडली होती. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि त्यांना विधानपरिषदेवर आमदार करण्यात आलं.
मात्र
“अमोल मिटकरी यांनी इतर राजकीय नेत्यांप्रमाणे गुलामी स्वीकारली का ?”
असा प्रश्न नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर विचारल्या जात आहे. संभाजी ब्रिगेडकडून त्यांना चांगलच ट्रोल केल्या जात आहे.
RBI न खडकावल तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाम राहणारा महाराष्ट्राचा मुस्लिम मुख्यमंत्री
मला ट्रोल करणारी लावारस कारटी- मिटकरी
एकनाथ शिंदे यांच्या पाया पडण्यावरुन ट्रोल होत असलेल्या अमोल मिटकरींना समाज माध्यमांद्वारे प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी नेटकऱ्यांना चांगलच धारेवर धरलं आहे. प्रतिक्रिया देतांना त्यांनी म्हटलं की,
” हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते. आणि ते माझ्यासाठी नेहमी वंदनीय आहे. त्यामुळे मी त्यांच्या पाया पडलो. नरेंद्र मोदिसुद्धा शरद पवारांच्या पाया पडतात. कारण ते मोदींना वंदनीय आहेत. आणि लावारस कारट्यांना काही काम नसल्यामुळे ते मला ट्रोल करत असतात.”
अस अमोल मिटकरी यांनी समाज माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी काय घडलं होत?
- जेव्हा बाबासाहेबांनी दिलेली बातमी केसरीमध्ये छापण्यास टिळकांनी नकार दिला…
- भर सभागृहात भाषण करणाऱ्या आमदाराला जेव्हा विलासराव देशमुखांनी सुनावलं…
- जेव्हा टीसीने पकडली होती आनंद दिघे यांची कॉलर…
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir