राज ठाकरेंची सभा उधळून लावू. भीम आर्मीच राज ठाकरेंना खुल चॅलेंज

महाराष्ट्र

मंडळी हा महाराष्ट्र शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारसरणीवर चालत आलेला आहे. मात्र राज ठाकरेंसारखे लोक हे राजकीय हितासाठी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून मतं मिळवण्याच्या इर्षेने वादग्रस्त वक्तव्य करत असतात आणि इथल्या सामान्य गोरगरीब कुटुंबातील तरुणांची माथी भडकवत असतात.

 

महाराष्ट्रातील राजकरणामध्ये सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चांगलाच गवगवा चाललेला आहे. मुंबई आणि ठाणे येथे झालेल्या सभेत त्यांनी धार्मीक वाद निर्माण करणारी वक्तव्य केली होती. ज्यामुळे समाजामध्ये अस्थीरता निर्माण होण्याची दाट शक्यता होती.

 

राज ठाकरे यांना देशातून तडीपार करा – भीम आर्मी

 

मात्र राज ठाकरे यांची पुन्हा सभा औरंगाबाद येथे १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी होणार आहे. आतापर्यंत या सभेला अनेक संघटनांकडून विरोध केल्या गेला. सरकार या सभेला परवानगी देणार की नाही यावर सर्वांचं लक्ष लागून होत. अखेर प्रशासनाने या सभेला परवानगी दिली.

 

मात्र भीम आर्मीने राज ठाकरे यांना सभा उधळून लावण्याच खुल चॅलेंज केलं आहे. भीम आर्मीन म्हटलं आहे की,

 

” औरंगाबाद येथे राज ठाकरेंच्या होणाऱ्या सभेला आमचा शेवटपर्यंत विरोधच असणार आहे. कारण त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडणार आहे. हिंदू-मुस्लिम दंगली होणार आहे. अस चिन्ह स्पष्ट झालेल आहे. राज ठाकरेंना पोलिसांनी परवानगी दिली, तर आम्ही ती सभा उधळून लावू. कारण या देशातला जो व्यक्ती या देशावर प्रेम करतो तो प्रत्येक माणूस या सभेला विरोध करत आहे.”

 

अस भीम आर्मीने म्हटलं आहे. 

 

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ राज ठाकरे च योगींना पत्र

 

काय असणार सभेची नियमावली ? 

 

मंडळी राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथे १ मे ला होणाऱ्या सभेसाठी पोलिस प्रशासनाने विशेष नियमावली जाहीर केलेली आहे. ज्यामध्ये एकूण १६ नियमांचा समावेश आहे. सभेमध्ये कुठल्याही जाती- धर्माबद्दल, प्रदेशाबद्दल, भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य करता येणार नाही.

 

सभा ही दुपारी ३:३० ते रात्री ९:३० या वेळेमध्येच व्हायला हवी. सभेसाठी एकूण श्रोत्यांची संख्या ही १५ हजारांहून अधिक नसावी. अशा एकूण १६ नियमांचं पालन राज ठाकरे यांना करायचं आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *