राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीच पत्र

राज ठाकरे

मंडळी सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राज ठाकरे यांच्या भाषणांनी धुमाकूळ घातलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेहमी विरोधात बोलणारे राज ठाकरे यांनी अचानक भाजपाच्या बाजूने भूमिका मांडल्याने त्यांनी सर्वांना अचंबित करून सोडलं आहे.

 

भारतीय जनता पक्षाच राजकारण हे नेहमी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून मत मिळवायचं असत आणि आता तोच डावपेच राज ठाकरे यांनी वापरायला सुरवात केली आहे. येत्या ५ जूनला राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणार असून त्याची जोरदार तयारी मनसे सैनिकांकडून केल्या जात आहे.

 

राज ठाकरेंना उत्तर भारतीयांची माफी मागीतल्याशीवाय अयोध्येत पाय टाकू देणार नाही – भाजप खासदार

 

मात्र दुसरीकडे मनसेचे पदाधिकारी बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षिततेविषयी मोठा खुलासा केला आहे. राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीच पत्र आपल्या ऑफिसला मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.

 

ते म्हणाले की,

 

” राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीच पत्र माझ्या ऑफिसला मला मिळालेलं आहे. मात्र हे पत्र कुणी पाठवलं याची मला कल्पना नाही. मी याबद्दल पोलीस प्रशासनाशी बोललो आहे.”

अस बाळा नांदगावकर यांनी यावेळी सांगितल. 

 

जोपर्यंत राज ठाकरे मनसे कार्यालयात येत नाही तोपर्यंत मीसुद्धा तिथे जाणार नाही – वसंत मोरे

 

राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल- बाळा नांदगावकर 

 

बाळा नांदगावकर प्रसार माध्यमांशी बोलत असताना पुढे म्हणाले की,

” राज साहेबांच्या सुरक्षिततेबद्दल मी आधीपण केंद्र सरकारशी बोललो आहे. मात्र त्यांनी माझी गोष्ट ऐकली नाही. मी या विषयावर आता केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे. मात्र राज्य सरकारने एक लक्षात ठेवाव, जर राज साहेबांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशीवाय राहणार नाही.”

अशी रोखठोक भूमिका बाळा नांदगावकर यांनी मांडली आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *