मंडळी भारतीय देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्ष व्हायला आली आहेत. मात्र हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून देण्यासाठी काही क्रांतिकारकांनी स्वतःच्या कुटुंबासहीत स्वतःला कुर्बान केलं आहे.
आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका क्रांतिकारकाबद्दल ते म्हणजे शहीद चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ रोजी मध्य प्रदेशमधील भवरा नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये झाला.
ते स्वतःचं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले नाही, तर आपल्या सोबतच्या अनेक लोकांना त्यांनी या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामील करून घेतलं. त्यांना आपल्या बालपणापासून सामाजिक चळवळींची आवड होती.
चंद्रशेखर आझाद यांचं मूळ नाव हे चंद्रशेखर तिवारी अस होत. मात्र एका चळवळीदरम्यानच्या घटनेने ते चंद्रशेखर तिवारीचे चंद्रशेखर आझाद झाले.
तर मंडळी झालं असं की, सण १९२१ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी असहकार चळवळीची सुरवात केली. ज्यामध्ये चंद्रशेखर आझादसुद्धा सहभागी झाले होते. मात्र या चलवळीदरम्यान त्यांना अटक करण्यात आली.
नंतर त्यांना जेव्हा न्यायालयात उभं करण्यात आलं, तेव्हा त्यांनी आपलं नाव चंद्रशेखर तिवारी न सांगता चंद्रशेखर आझाद अस सांगितल. त्या घटनेपासून त्यांना संपूर्ण जगभरात चंद्रशेखर आझाद या नावाने ओळखल्या जाऊ लागलं.
काकोरी कट
मंडळी भारतीय देशावर इंग्रजांचं राज्य असतानासुद्धा चंद्रशेखर आझाद हे निधड्या छातीने लढत होते. त्यांनी आपल्यासोबत १० क्रांतिकारकांना घेऊन इंग्रजांची काकोरी नावाची ट्रेन लुटली.
ज्यामध्ये इंग्रजांनी गोळा केलेल्या खजीन्याचा साठा होता. मात्र या कटामध्ये सामील असलेल्या राम प्रसाद बिस्मिल्ला, अश्फाक उल्ला यासारख्या अनेक क्रांतिकारकांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली.
अखेर झंझावात शांत झाला…
मंडळी ब्रिटिश पोलिसांशी आझाद यांची अलाहाबादमधील एका पार्कमध्ये चकमक झाली. ब्रिटिशांनी संपूर्ण पार्कला वेढा घातला होता. आझाद यांनी काही ब्रिटिशांना ठारही केलं होतं.
मात्र त्यांच्या बंदुकीमध्ये आता फक्त एक गोळी उरलेली होती. ब्रिटीशांच्या गोळीने मरण्यापेक्षा स्वतःच्या हाताने स्वतःला गोळी मारणं त्यांनी पसंत केलं. आणि ते या भारतीय देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत शहीद झाले.