मंडळी राजकीय क्षेत्रामध्ये आपण राजनेत्यांची बाचाबाची नेहमीच पाहत आलो आहोत. काही वेळा राजकीय नेत्यांमधला उफाळून आलेला वाद हा न्यायालयापर्यंतसुद्धा जात असतो. तसच काही प्रकरण प्रहार पक्षाचे प्रमुख व राज्यमंत्री मा. बच्चू कडू यांच्या बाबतीत घडलंय.
बच्चू कडू हे सद्ध्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्राचे राज्यमंत्री आहेत. २०१४ च्या निवडणूकीत प्रतिज्ञापत्र सादर करतांना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅट लपवण्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला.
अमरावती येथील भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत पोलीस प्रशासनाला तक्रार केली होती. चांदुर बाजार येथील प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय देताना बच्चू कडू यांच्यावर कारवाई केली आहे.
दोन महिन्यांचा कारावास
बच्चू कडू यांची कार्यप्रणाली भाजपविरोधी असल्याकारणाने भारतीय जनता पक्षाने त्यांचा वचपा काढल्याचे निकष नेटकऱ्यांकडून काढले जात आहे. २०१४ साली बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगासमोर आपल्या संपत्तीची माहिती देणार प्रतिज्ञापत्र सादर केलं होत. यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती.
याविरोधात अमरावतीचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होती. या खटल्यात चांदुर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने बच्चू कडू यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला व तसेच दोन महिने सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली.
भारतीय जनता पक्षाने बच्चू कडू विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना त्या गुन्ह्याअंतर्गत शिक्षासुद्धा झाली. मात्र यावर आता राज्यमंत्री बच्चू कडू व प्रहार पक्षाची काय भूमिका असेल हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेल नाही. हे प्रकरण आता कुठलं वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.