मंडळी राजकारणामध्ये राजकीय नेते समाजकारण करत पोकळ आश्वासनांची टोलेबाजी करत असताना आपण बऱ्याचदा बघतो. पण \"२०१४ मध्ये मा. मोदीसाहेब १५ लाख रुपये देतो अस म्हटलेच नाही.\" अस विधान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलय. दिनांक २२ डिसेंबरला २०२१ ला विधानसभेमध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिवसेना आमदार भास्कर जाधव आणि विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या मोदींसाहेबांच्या कामकाजावरुन चांगलाच गदारोळ झाला. तर मंडळी झालं असं की, विधानसभेमध्ये वीज कापणी संदर्भात बोलत असताना देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात चर्चा चालू असताना शिवसेना आमदार मा. भास्कर जाधव यांनी हस्तक्षेप करत अस विधान केल की, \"२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी १०० वेळा म्हणाले आहेत की \' काला धन लाने का की नहीं लाने का? तो लाने का.. लाने का तो कहा रखने का? यू ही रखने का\'. नितीन राऊत आणि भास्कर जाधव हे चर्चेत वरचढ ठरत असल्याकारणाने देवेंद्र फडणवीस यांनी चक्क सभागृहाला आपल्या विधानाने हसवत आश्चर्यचकितच केलं. ते म्हटले की, \"मोदीसाहेब १५ लाख रुपयांबद्दल काही बोललेच नाही\". यावर सम्पूर्ण सभागृह देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर त्यांना हसत होत.
चोरी करून चोरी नाकारणारे चोर…
मंडळी वरील शीर्षक देवेंद्र फडणवीसांना अगदी साजेस अस दिसत. मोदी साहेब २०१४ च्या प्रचार सभेत ओरडू ओरडू सांगत होते की, परदेशामध्ये असलेला काळा पैसा वापस आणू. नोटबंदी केल्यानंतर काळा पैसा पुढे आला नाही मात्र ९९% चलनात असलेला पैसा बँकांमध्ये जमा झाला. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आजही त्रास भोगावा लागतो आहे. मात्र या विषयावर बोलायचं मा. मोदीसाहेब नेहमी टाळत असतात. फडणविसांसारखे नेते मोदीसाहेबांनी या प्रकारची आश्वासनं केलीच नाही अस वर तोंड करून सांगतात. आपण दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकलो नाही. हे स्वीकारण्यापेक्षा आम्ही आश्वासनं दिलीच नाही. असा खोटा गवगवा भारतीय जनता पक्षाचे नेते हल्ली करतांना दिसत आहेत. अर्थात यालाच म्हणतात चोरी करून चोरी नाकारणे.
जानकीबाई आपटे मूक-बधिर विद्यालय अहमदनगर