राजनीतिक पक्ष – भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
कार्यकाल – २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ (11 वर्ष ५९ दिवस)
कार्यकाल – १४ जानेवारी १९८० ते ३१ ऑक्टोबर १९८४ (४ वर्ष २९१ दिवस)
जन्म – १९ नोव्हेंबर, १९१७, इलाहाबाद, उत्तरप्रदेश
आई – कमला नेहरू
वडिल – जवाहरलाल नेहरू
पती – फिरोज गांधी
मुले – राजीव गांधी, संजय गांधी
सुना – सोनिया गांधी, मेनका गांधी
नातवंडे – राहुल गांधी, वरून गांधी, प्रियंका गांधी
निधन – ३१ ऑक्टोबर १९८४, नवी दिल्ली
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान “इंदिरा गांधी” यांना दिला जातो. त्यांनी भारताच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार बरेच वर्ष सांभाळला आहे.
इंदिरा गांधी यांनी वयाच्या १२ वर्षी काही मुलांना एकत्र घेऊन आपली वानर सेना तयार केली होती.
इंदिरा गांधी यांनी लहान मुलांना एकत्रित करून त्यांच्या सोबत भारताच्या स्वातंत्र्याकरता संघर्ष करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.
याव्यतिरिक्त, “इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदावर असतांना सन १९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धांच्या वेळी भारताचे कौशल्यपूर्वक नेतृत्व करून भारताला विजय मिळवून दिला होता.”
शेजारील देशांसोबत असलेले आपल्या देशाचे संबंध चागल्या प्रकारे सुधारित करण्याकरता त्यांनी खूप महत्वाची पाऊले उचलली होती.
यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच उंचावली गेली. इंदिरा गांधी यांची प्रतिमा एका हुशार राजनीतिक नेत्याच्या रुपात बनली.
याशिवाय, इंदिरा गांधी यांनी देशातील कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता अनेक प्रकारच्या योजना सुरु केल्या.
देशातील बेरोजगारीची समस्या नष्ट करण्याकरता आणि देशाला अन्न धान्याच्या उत्पादना बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.