मंडळी राणा दाम्पत्य सध्या महाराष्ट्रातील राजकारणात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. खासदार नवनीत राणा navneet rana आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नवनीत राणा navneet rana आता स्वतः दलीत असल्याकारणाने इथलं प्रशासन त्यांना दुय्यम वागणूक देत आहे असा कांगावा करत आहे. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये राणा दाम्पत्याला पोलीस प्रशासनाकडून दिली जाणारी शाही वागणूक बघून राणा दाम्पत्याची महाराष्ट्रातील जनतेसमोर आता चांगलीच पोलखोल झाली आहे.
नवनीत राणा यांचं ब्लड प्रेशर वाढलं, भायखळा रुग्णालयात दाखल
सध्या न्यायालयीन कोठडीची हवा खात असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी एक वाढ झाली आहे. नवनीत राणा navneet rana यांचे दाऊद गँगशी संबंध असल्याचा संशय मुंबई पोलीस प्रशासनाला आला आहे.
नवनीत राणा Navneet Rana यांनी दाऊद गँगमधील युसूफ लकडावाला यांच्याकडून ८० लाखांच कर्ज घेतल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येत्या काळामध्ये याप्रकरणासंबंधी लकडावाला आणि नवनीत राणा यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत
राणा दाम्पत्याला दलीत समाजातून असल्यामुळे दुय्यम वागणूक दिली जात आहे – फडणवीस
राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर नवनीत राणा navneet rana यांनी आरोप केला होता की मी मागासवर्गीय असल्याकारणाने मला दुय्यम वागणूक पोलीस प्रशासनाकडून दिली जात आहे. यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा हा मुद्दा उचलून धरत नवनीत राणा यांच्या आरोपाला हवा देण्याचं काम केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितल की,
” नवनीत राणा या दलीत समाजातून असल्याकारणाने त्यांना राज्य सरकारकडून दुय्यम वागणूक दिली जात आहे.”
अस फडणवीस म्हणाले. मात्र आता हा नवनीत राणा आणि शिवसेनेमध्ये पेटलेला वाद कुठलं वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये
- नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य
- मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य
- शरद पवारांना आम आदमी पक्षाच पत्र
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir
Pingback: 2023 new dey