मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट आणला आहे तो म्हणजे राणा दाम्पत्याने. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केल्याशिवाय परत जाणार नाही असं आव्हान शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना देऊन आणि मुंबईमध्ये येऊन राणा दाम्पत्याने सर्वात मोठी चूक केली अस संपूर्ण महाराष्ट्राला सध्या वाटत आहे.
राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर हजारो शिवसैनिकांनी त्यांच्या घराला वेढा घातला. याचकरणाने राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाण्यास अपयशी ठरलं. मात्र पोलीस प्रशासनानेच राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य
न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आमदार रवी राणा यांनी स्वतःचा आणि नवनीत राणा यांचा जामीन अर्ज कोर्टात सादर केल्यानंतर कोर्टाने एवढ्या लवकर निर्णय देण्यास नकार दिला.
दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांची प्रकृती मंदावली आहे. काल त्यांच चेक अप करण्यात आलं तेव्हा त्यांचं ब्लड प्रेशर हे वाढलेलं आहे असं लक्षात येताच त्यांना भायखळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणली
प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसल्यास दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येईल असे आदेश भायखळा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिले आहे.
राणा दाम्पत्यांनी स्टंटबाजीसाठी हे सर्व केलं- छगन भुजबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ आज नाशिकमधील येवला तालुक्क्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी प्रसार माध्यमांद्वारे राणा दाम्पत्यांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की,
” राण दाम्पत्यांनी हे सर्व स्टंटबाजीसाठी केलं. त्यांना संपुर्ण देशभर प्रसिद्धी पाहिजे होती. यामागे त्यांचा हाच मनसुबा असावा.”
असे जेष्ठ छगन भुजबळ यांनी सांगितलं. मात्र यावर आता राणा दाम्पत्य काय प्रतिउत्तर देणार यावर सर्वांच लक्ष लागून आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य
- राणा दाम्पत्याची अखेर माघार
- राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत
- मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : https://www.facebook.com/PoliticalWazir