Nitesh Rane नितेश राणे यांचा शिवसेनेविषयी असणारा द्वेष

Nitesh Rane

मंडळी एकीकडे महाराष्ट्रतल्या राजकारणाचा फुल फोकस राज ठाकरेंवरून राणा दाम्पत्याकडे वळला असतांना नितेश राणे Nitesh Rane यांनी खळबळजनक खुलासा करून शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना अडचणीत आणलं आहे.

नितेश राणे यांचा शिवसेनेविषयी असणारा द्वेष आता चांगलाच उफाळून निघाला आहे. नितेश राणे Nitesh Rane यांनी अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सगळीकडे चांगलाच व्हायरलसुद्धा होत आहे.

माझ्यावरील हल्ल्यामध्ये पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुंडांना साथ – किरीट सोमय्या

सत्तार एका व्यक्तीला हनुमानावरून शिव्या देत असल्याच या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हनुमानाविषयी असे उदगार काढणाऱ्या अब्दुल सत्तार यांना ताबडतोब अटक करण्यात यावी अस आव्हान नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केलं आहे.

प्रसार माध्यमांशी बोलत असतांना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हटलं की,

” अब्दुल सत्तार जे हे उदगार काढत आहे यावर मुख्यमंत्री कुठली कारवाई करणार? सत्तार यांना अटक करून स्वतःमध्ये असलेली मर्दानगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दाखवणार का? ज्या पद्धतीने ते शिवीगाळ करत आहे त्याच पद्धतीने जर सत्तारांच्या धर्मावर केला, तर त्याला परवडणार का?”

असे प्रश्न नितेश राणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापुढे उपस्थित केले आहे. 

राज ठाकरे ही भाजपची C टीम – अब्दुल सत्तार

नितेश राणे यांना महाविकास आघाडी सरकारने अटक करून ३ दिवस तुरुंगामध्ये ठेवलं होतं. या कारणाने त्यांचा शिवसेनेविषयी असणारा राग आता चांगलाच उफाळून येतोय. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अब्दुल सत्तार आणि नितेश राणे या दोघांपैकी कुणाची बाजू घेतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *