मंडळी एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या चार राज्यांमध्ये झालेल्या निवडणूक यशाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेत्यांची धामधूम झाली आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या अटकेचा वाद सुटत नाही आहे. किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एक प्रकरण पुढे आणलं आहे.
“आता अनिल परबचा ही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा याची चौकशी होणार. भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे, ३० मार्च रोजी सुनावणी होणार.”
अस म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांना सूचक इशारा दिला आहे.
ते पुढे म्हणाले की,
“आता पुढचा नंबर अनिल परबचा. याचबरोबर यशवंतराव जाधव संबंधात जी आयकर विभागाच्या पाहणीत खूप माहिती बाहेर आली. ४० ठेकेदारांची सखोल माहिती महापालिकेकडून आयकर विभागाने मागवली आहे. तीन अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत. त्याचा अभ्यास सुरू आहे आणि या तपासात ईडी आणि कंपनी मंत्रालयाने देखील रस दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात महत्वाचा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
घोटाळेबाजांना उघड करणार- किरीट सोमय्या
किरीट सोमय्या महाविकास आघाडीकडून बहुतेक त्यांच्यावर झालेल्या मारहाणीचा वचपा काढत आहे. असच त्यांच्या हालचालीवरून निरखून दिसत आहे. प्रसार माध्यममांशी बोलत असताना ते म्हणाले की,
” आता अनिल परब आणि यशवंत जाधव यांच्यामधल्या अटक होण्याच्या शर्यतीत कोण नंबर मारेल. हे बघण महत्वाचं. तसेच घोटाळेबाजांना उघड करणं हा जर गुन्हा असेल तर, तो गुन्हा एक हजारवेळा करण्यासाठी मी तयार आहे. किरीट सोमय्याने जर राजकीय बळाचा दुरुपयोग केला असेल, तर माझ्याविरुद्ध कारवाई करा, अस मी अगोदरच म्हणालेलो आहे.”