गोळीबाराचे आदेश, १०६ जणांच बलिदान आणि महाराष्ट्राची निर्मिती

बलिदान

मंडळी अस म्हणतात की महाराष्ट्र ही संतांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यदायी इतिहासाची भूमी, फुले शाहू आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय क्रांतीने जागृत झालेली भूमी.

 

मात्र याच महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी महाराष्ट्रातील जनतेला प्रंचड संघर्ष करावा लागला. ज्यामध्ये अनेक लोकांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागले. भारतीय देशाच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १ मे १९६० साली महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली.

 

आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुरवात झाली…

 

आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या हातामध्ये मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याची धुरा देण्यात आली. स्वातंत्र्यानंतर सुरवातीच्या काळात देशाची एकात्मता धोक्यात येईल म्हणून भाषेनुसार राज्य विभाजनाला काही जेष्ठ नेत्यांनी विरोध केला होता.

 

परंतू १९५३ साली केंद्र सरकारन देशातील भाषिक राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला. मात्र यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांना वगळण्यात आलं. त्यावेळी महाराष्ट्राला वेगळ्या राज्याचा दर्जा न मिळण्याच एक खास कारण होत. ते म्हणजे मुंबई.

 

मुंबई हे भांडवलदारांसाठी व्यवसायाच विद्यापीठच होत अस म्हणणं वावग ठरणार नाही. कारण त्यावेळी मुंबईचा विकास हा झपाट्याने झाला होता. याच कारणामुळे भांडवलदार मुंबई सोडायला तयार नव्हते. आणि मुंबईला महाराष्ट्राच्या स्वाधीन करणं हे केंद्रसरकारलाही मान्य नव्हतं.

 

आणि शिवसेनेला वसंतसेना म्हणून हिनवल्या जाऊ लागलं… 

 

गोळीबाराचे आदेश आणि बलिदान

 

मंडळी त्यानंतर १९५५ साली काँग्रेस वर्किंग कमिटीने मुंबई, महाराष्ट्र, गुजरात अशा त्रीराज्याचा प्रस्ताव मांडला. सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रातील जनतेन रस्त्यावर उतरून निदर्शने केली.

 

जनतेचा हा आक्रोश बघता केंद्रसरकारने विदर्भ महाराष्ट्रात व कच्छ गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. आणि मुंबईला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. मात्र महाराष्ट्रातील जनतेला मुंबई हे महाराष्ट्रात हवी होती.

 

याच लढ्यासाठी महाराष्ट्रातील कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष व असे अनेक पक्ष एकवटले आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी अनेक आंदोलने-मोर्चे काढले. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मुरारजी देसाई यांनी आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले.

 

ज्यामध्ये १०६ लोकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र अखेर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १ मे १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. ज्याची धुरा मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या हातामध्ये देण्यात आली.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *