मंडळी मोठ्या मुश्किलीने बसलेल महाविकास आघाडीच सरकार जरी आजपर्यंत टिकून आहे. मात्र हे महाविकास आघाडीच सरकार बरखास्त करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून नेहमीच करण्यात आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर गंभीर १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केल्या असल्याचा आरोप केलेला आहे.
शिवाय संजय राऊत यांची लवकरच तुरुंगात रवानगी होणार असल्याच सोमय्या यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडीविरोधात नेहमीच आक्रमक राहलेले आहे.
हे महाविकास आघाडीच सरकार कशाप्रकारे बरखास्त करता येईल याकडे त्यांचा कल जास्त प्रमाणात दिसून येतो. मात्र भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेनेच्या सैनिकांकडून किरीट सोमय्या यांना मारहाण झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारसोबत विविध कारणातून वाद घालतांना दिसत आहे. मात्र शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्षाला चांगलाच जवाब दिलेला आहे.
संजय राऊत म्हणाले की,
“गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर निंदनीय आरोप केले जात आहेत. अपप्रचार करणाऱ्यांमुळे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असून त्यांची बदनामीही होत आहे. या अट्टल खोटारड्यांना कठोर कारवाई सामोरे जावे लागेल.”