पंकजा मुंडेंची जातीच्या आधारे राजकीय खेळी!
बीड लोकसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येवुन ठेपली आहे. आणि अशातच या लोकसभा निवडणुकीने वेगळेच वळण घेतले आहे. आधी प्रितम मुंडेंची उमेदवारी रद्द करुन पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली, म्हणुन चर्चा होती. परंतु आत्ता या निवडणुकीत ओबीसी विरुध्द मराठा असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा बीड लोकसभा निवडणुक चर्चेचा विषय बनली आहे.
मराठा समाज बजरंग सोनवणे यांना समर्थन देत आहे. परंतू पंकजा मुंडे सोबत रमेशराव आडसकर, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा असे मराठा नेते आहेत. परंतु हे नेते जरी असले तरी या मतदारसंघात मराठा समाजाची पंकजा मुंडे वरची नाराजी महायुती साठी चिंतेचा विषय बनत चालली आहे.
मराठा समाजातील मतदार पंकजा मुंडेंना प्रचारा दरम्यान काळे झेंडे दाखवून विरोध करताना दिसत आहे. अशातच पंकजा मुंडे अपला उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन करत,
“सर्वच समाज माझ्या उमेदवारीचे स्वागत करत आहे. बंजारा समाजानी पांमडी देवुन, धनगर समाजानी घोंगडी देवुन हातात काठी देवुन, मराठा समाजाने भगवा लावुन आणि पगडी बांधुन माझे स्वागत केले आहे.
परंतु त्यांनी पुढे बोलताना
“सगळ्या समाजाचे लोक आलेत ना इथे” असे विचारत “धनगर समाजाचे लोक आलेत ना त्यांनी येळकोट… येळकोट…. जय मल्हार बोला, बंजारा समाजाचे लोक आलेत ना त्यांनी जय सेवालाल बोला, माळी समाजाचे लोक आलेत त्यांनी जय ज्योती बोला”, अशा घोषणा देवुन शेवटी “मराठा समाजाचे लोक आलेत ना?” अस विचारत “छत्रपती का आमचे नाहित का?” असा प्रश्न करत, जय जिजाऊ जय शिवराय आशा घोषणा दिल्या आणि “तुम्ही माझ्या साठी मत मागा आणि माझ्या झोळीत टाका”
असे आव्हान पंकजा मुंडेंनी यांनी मतदारांना केले. त्यामुळे मराठा समाजाचे मत मिळवण्यासाठी पंकजा मुंडे जातीचा आधार घेत आहेत, अशी टिका विरोधक करत आहेत. त्यांच्या भाषणाने आणि घोषनेने मराठा समाजाची नाराजी दुर होइल का? आणि पंकजा मुंडे निवडुन यातील का? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.