आमदार ,खासदार आणि मंत्री हे समाजाचं नेतृत्व करतात पण जर आपला प्रतिनिधिच हा राजकीय निरक्षर असला तर कसा गोंधळ उडतो हे बघायला मिळत.
नेमकच विधानसभेत राम सातपुते यांनी शरद पवारांचा केलेला एकरी उल्लेख हा फक्त राम सातपुते यांनाच नव्हे तर संपूर्ण सत्ताधारी लोकांनासुद्धा महागात पडल्याच दिसून येत.
सध्याचा काळात तर बऱ्याच नेत्यामध्ये राजकीय साक्षरता हि पाहायला मिळतच नाही . पूर्वीच्या काळातही राजनीतिक वातावरण यापेक्षाहि गंभीर असायचा पण नेत्यांमधे एकमेकाप्रती आदर हा दिसून यायचा .
जर दोन प्रतिनिधिचे आप-आपसात जमत नाही याचा अर्थ असा नव्हे की ते एकमेकांच्या विरोधातच असायला हवे प्रश्न जेव्हा जनतेचा असतो तेव्हा नेता पक्ष विसरून एकत्र येतो त्यातच त्या नेत्यांची राजकिय साक्षरता दिसून येते.
पण हल्लीच्या काळात राजकारण्यांनी त्यांची मर्यादा ओलांडल्या आहेत ,तर राजकीय प्रतिनिधि प्रसार माध्यमासमोर वंगाळ आणि शिवीच्या भाषेत बोलतो हे कितपत योग्य आहे ?
एक प्रतिनिधी हा नारायण राणेंची भर सभेत नक्कल करतो त्याला प्रत्युत्तर देताना नारायण राणेंचे सुपुत्र पत्रकारितेचा आधार घेत प्रसार माध्यमासमोर अभद्र भाष्य करतात .
एक सुजाण नागरिक या नात्याने पाहता महाराष्ट्राच्या बदलात शरद पवार यांचं फार मोठं योगदान आहे हे सांगायची वेगळ काही गरज नसावी परंतु जर याच व्यक्तीच्या नावाने विधानसभेत विरोधी पक्षनेत्याकडुन एकेरी उल्लेख होणं हे योग्य नव्हे.
महाराष्ट्राच्या राजनीतिक काळात खूप नेत्यांनी त्यांचं योगदान दिलेले आहे त्यात प्रामुख्याने स्व.बाळासाहेब ठाकरे ,शरद पवार आणि गोपीनाथ मुंढे यांचं नाव अग्रेसर आहेत .
एकीकडे असले गलिच्छ राजकारण होतय तर दुसरीकडे
सत्यजित तांबे सारखे एकनिष्ठ आणि तत्ववादि लोक कमी पाहायला मिळतात ज्याच्या कुटुंबाने काँग्रेस साठी २-३ पिढ्या दिल्या त्याच माणसाला काही नेत्यांच्या उपस्थितीत पक्षामधुन बेदखल केलं जातं हे कितपत योग्य आहे ?
एकीकडे बंड पुकारुन जो तो खरोखर प्रशंसनीय बाब आहे…..
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता
- लाल सलाम !
- माजी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख – पोलिटिकल वजीर
- ‘सत्ता’ तंञ
- देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?
तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
Facebook : Political Wazir