मंडळी उत्तर प्रदेश, उत्तराखंड , गोवा आणि मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण व्यस्त झालंय. महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलीच वादावादी सुरू झालीय.
त्याचबरोबर त्यांनी एकमेकांवर वक्तव्य करून राजकीय खेळ खेळायला सुरवात केली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली.
त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारणात कोणत्या घडामोडी घडणार याकडे राज्याच लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाच्या चार राज्यांमध्ये झालेल्या विजयानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.
भाजपच्या विजयानंतर महाविकास आघाडी सरकार व महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षामध्ये राजकीय नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन बैठका करत आहेत. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गोवा विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना खोट्या खटल्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट देऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंशी चर्चा केली.
ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुका ह्या पुढे ढकलल्या कारणाने राजकीय गदारोळ माजला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विधान केलं होतं की,
” ये तो सिर्फ झाकी है।”
तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिउत्तर देतांना म्हटलं की,
“महाराष्ट्रा भी तैयार है।”
मात्र महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच काय चित्र असेल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.