‘सत्ता’ तंञ

सत्ता

हल्ली महाराष्ट्रातील झालेल सत्तातंर बघता सामान्य जनतेला अनेक प्रश्न पडले असावे…..

 

भारत देशाने इथल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाहीचा स्वीकार केला आणि नक्कीच लोकशाही देशात आपल्याला सामान्य जनतेतील निडरपणा दिसून येतो.

 

पण जर लोकशाही राज्यात जर जनतेला एखादा प्रतिनिधी देण्यासाठी बहुमताने विजयी कराव यातुनच त्या प्रतिनिधीचे वास्तविक विचार जनतेसमोर येतात आणि हेच विजयी प्रतिनिधी होणाऱ्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग ठरु शकतात .

 

देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

 

राजकीय नेता हा संवेदनशील आणि काळानुसार बदलणारा हवा त्याचे उद्दिष्ट हे सत्ता मिळविणे नसून तिथल्या लोकांना रोजगार ,शिक्षण आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणारे असावे .

 

राजकीय नेत्यांसाठी सत्ता हि ५ वर्षाची असते पण जर याच प्रतिनिधीने त्याच्या सत्ताकाळात रोजगार उपलब्ध करुन दिला तर त्या रोजगार प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला आणि त्या कुटुंबियांना पुढील ५० वर्षे तो राजकीय प्रतिनिधी लक्षात राहतो .

 

ज्या प्रतिनिधींचे लक्ष हे निवडणूकांवर असते तो व्यक्ती त्याच्या जीवनात फक्त आणि फक्त राजकीय नेता म्हणून ओळख निर्माण करतो

 

तर सामाजिक जनतेच्या विकासासाठी झटणारा सामाजिक प्रतिनिधी म्हणून छाप पाडतो परिणामी सामाजिक नेता हा राजकीय नेत्यापेक्षा जनतेला आपलासा वाटतो .

 

प्रबोधनकारांचे कुळ की पुरंदरेचे गोत्र? – गंगाधर बनबरे ( संभाजी ब्रिगेड)

 

सामाजिक प्रतिनिधीना विकास करण्यासाठी आणि जनतेच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी गरज असते ती पदाची त्या कारणास्तव निवडणूक लढवणे आणि निवडून येणे भाग पडते ,

 

हे सर्व घडत असताना जनतेच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या असतात जनतेने व्यवस्थितरीत्या पार पाडायला हव्यात सहसा आपलं मत हे योग्य उमेदवारास देणे .

 

“सत्ता हि काही पैसे कमावण्यासाठी मिळालेली ५ वर्षे नसून जनतेच्या अडचणींचे निरासन करुन बदल घडवण्याचा काळ असतो ……..!”

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *