मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सुरू असलेला घमासान हा सामान्य माणसाला न कळण्यासारखा आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांवर ईडी चौकशीचे हल्ले करत असताना आता महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी तिसरा पाय काढला आहे.
सतत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपवर टीका करणारे राज ठाकरे यांनी अचानक भाजपच्या बाजूने मुसंडी घेत आपली मराठी अस्मिता निलामी काढलेली आहे. गुडीपाडव्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबई येथे घेतलेल्या सभेदरम्यान महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं काम केलं.
भारतीय जनता पक्षावर नेहमी टीका करणारे राज ठाकरे एकही शब्द भाजप विरोधात न बोलल्यामुळे आता भाजप मनसे युतीची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राज ठाकरे यांनी मुंबईमधल्या किंवा महाराष्ट्रभरातल्या समस्यांना हात न घालता मुस्लिमांचे भोंगे बंद करण्यासाठी मंदिरात हनुमान चालीसा लावू अशा प्रकारचं धार्मिक तेढ निर्माण करणार भाषण करायचं काम केलं आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील ?
मंडळी राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त मुंबई येथे घेतलेल्या सभेतील भाषणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. राज ठाकरे यांच पाऊल भाजपकडे युतीसाठी वळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते गुलबराव पाटील यांनी राज ठाकरेंची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
ते म्हणाले की,
“उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू असतात. तसेच राज ठाकरे यांचे तीन ऋतू आहेत, कोणत्याच ऋतूला यांना काहीही मिळत नाही.”
अस ते म्हणाले. मात्र गुलाबराव पाटील यांच्या या विधानावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.