मंडळी काल सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक उपस्थित नेत्याने जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी ठाणे आणि मुंबईमध्ये झालेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कडाडून टीका केली होती.
परिणामी इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेच मेन टार्गेट हे राज ठाकरेच बनले. राज ठाकरे यांनी स्वतः आपल्या भाषणातून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली होती. मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जातीयवादी म्हणून ते कधीही छत्रपती शिवरायांच नाव घेत नाही असा आरोप केला होता.
या पार्श्वभूमीवर काल इस्लामपूरमध्ये बोलतांना सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं की,
” राज ठाकरे यांनी शरद पवार साहेबांना जातीयवादी म्हटलं. पण त्यांना मला सांगायचं आहे, की माझ्यापासून तर अमोल मिटकरींपर्यंत प्रत्येक माणसाला उच्च पदावर नेण्याचं काम हे शरद पवार यांनी केलं आहे. माझ्यासारखा एक भटक्या जातीमधला समाजातला एक सर्वसाधारण तरुण जो २०१४ च्या निवडणूकीत सबसेल पराभूत होतो. अशा पराभूत झालेल्या तरुणाला कुठलीही जात धर्म न बघता विधान परिषदेच वरीष्ठ सभागृहाच विरोधीपक्षनेते पद दिल जात. त्या शरद पवारांना राज ठाकरे जर जातीयवादी नेते म्हणत असतील, तर त्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे.”
अशाप्रकारची जहरी टीका धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
राज ठाकरे भाजपचे अर्धवटराव- धनंजय मुंडे
काल इस्लामपूरच्या सभेमध्ये टीका करत असताना धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंचा भाजपचा अर्धवट राव असा उल्लेख केला. ते म्हणाले की,
” मी लहान असताना शाळेमध्ये एक नाटक दाखवल्या जात होतं. ज्यामध्ये रामदास पाध्येच्या हातामध्ये एक बावल असायचं. त्याच नाव अर्धवट राव होत. जेव्हा रामदास पाध्ये जे बोलत नाही ते त्यांच्या हातामधल अर्धवटराव नावच बावल बोलायचं. मात्र ते सगळं बोलणं रामदास पाध्येंचच असायचं. तसेच भारतीय जनता पक्षाचे राज ठाकरे हे अर्धवट राव आहे आणि भाजपा ही रामदास पाध्ये आहे.”
अस बोलतांना त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.