पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये

covid 19 corona virus

एंबुलंस चा तो ह्रदयाला छेद देणारा आवाज घरापासून धावत निघाला…

 

छातीत धडधड वाढली असतांना आईने मात्र हात पकडून धरला होता…

 

” जाऊ नको जवळ कोरोना आहे…!! “

 

म्हणून आईने घराच्या उंबरठ्यावर च रोखलं पण डोळ्यासमोर लहानपणापासून मोठ्या होत  गेलेल्या पोराला आज एंबुलंस मध्ये जातांना पाहून डोळे भरून तीचेही आले होते… पण तेव्हाच्या परिस्थिती ने रोखलं होतं..

 

नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य

 

 

गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये एडमिट करून तिथेही ऑक्सिजन चा तुटवडा म्हटल्यावर जिल्ह्यात रात्री उशिरा नेण्याची ताकीद डॉक्टरांनी दिली..

 

 

त्यात सोबत जायला तयार कोणीही नाही..

 

 

तेव्हा आयुष्यभर ची साथ देणारी बायको रात्री दोन वाजता एकटी त्या एंबुलंस मध्ये निघाली.. तोंडावर ऑक्सिजन लागलेला नवरा पाहून डोळ्यावर पदर लावून तेवढा नवर्याचा हात पकडून एवढ्या रात्री जिल्ह्यातील दावाखान्यात जाऊन सर्व कागदपत्रे पुर्ण करून नवर्याला एंबुलंस मधून उतरवून दावखान्याच्या मेन गेटपर्यंत गेली आणि डोळे भरून तीने नवर्याला पाहीलं…. बस्स तीथुन सकाळी पाच वाजता ती घरी आली..

 

महाविकास आघाडीने कोरोना काळात केलेले एक काम दाखवा- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

 

तेव्हा पर्यंत सर्व एरीया मध्ये खबर (covid 19) पहोचली ,  रात्री घाबरलेली आई सुद्धा मन पक्क करून वहिनींना भेटायला गेली… तेवढे धीर सोडून दुसरे काहीही नव्हते द्यायला कुणाकडे  ..

 

 

दुपारी थोडे फार बरे वाटलं म्हणून नवर्याचा फोन आला.. , जेवण पहोचलं नव्हते दुपार पर्यंत.. दावखान्यात पेशंटच्या वाढणाऱ्या गर्दी, प्रत्येक क्षणाला एक मयतीचा फुटणारा टाहो सर्व काही वेदनादायक होतं.

 

 

रात्र झाली… वहीनी च्या डोळ्यासमोर झोप नव्हती सकाळी लवकर उठून तीने गणरायाच्या मुर्ती ला हातात घेतलं भरल्या डोळ्यांनी अक्षद लावून, दुर्वा ठेवून गणरायाच्या मुर्तीला नवर्याच्या लवकर परतीचा  नवस मागुन ती पाण्यात टाकणारच की एक फोन आला आणि सर्व संपलं..

 

 

रात्री ऑक्सिजन अभावी  तीच्या जिवनाचा ह्रदय श्वास थांबला…

 

छाती आदळून रडणारी ती , हातातील बांगड्या जमीनीवर आपटून रडणारी ती आजही डोळ्यासमोर येते…

 

सकाळी दहा ला दावखान्यात नवर्याची  डेथबॉडी घेऊन स्मशानभूमीत गेल्यावर चिता पेटण्याची रांगेत तीचा रात्री अकरा ला नंबर लागला आणि एक ला अस्थि कलश घेऊन ती परतली..

 

सर्व काही डोळ्यासमोर होत असतांना सूद्धा सर्व हतबल झाले होते..

 

आज ती भांडी घासायला बाहेर जाते , मुलांचं.शिक्षण करायचय  , सरकार चे अनुदान कागदावर च राहलं..

 

आणि आज एक वर्ष उलटून जेव्हा आजच्या परिस्थिती च दर्शन होतं

 

तेव्हा न पेटलेल्या चिता आज नेत्यांच्या भक्तीची यज्ञकुंड मांडून बसलीत , कुणाला थोडी सूद्धा आम्ही कुठल्या परिस्थिती ला समोर गेलो याची पर्वा राहली नाही..

 

चलणारे घाणेरडे राजकारण, आणि त्याला कार्यकुत्र्यांचे मिळणारे समर्थन बघून फक्त एवढेच वाटतं…

 

पेटलेल्या नेत्यांच्या भक्तीच्या यज्ञकुंडात आहुती राष्ट्राचीच जाऊ नये…….

 

✍🏻अक्षय चंदेल ©

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *