मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये घेतलेल्या सभेत अप्रत्यक्षपणे सांगितल की, ते आगामी निवडणूका भारतीय जनता पक्षासोबत लढणार आहेत. मात्र काल बोलत असताना बऱ्याचदा राज ठाकरेंची जीभ घसरली.
ठाकरे साहेबांच्या बोलण्यात मोदींसाहेबांप्रमाणे काही तथ्य दिसलं नाही. सर्व तिर काल ते हवेमध्ये उडवायचा प्रयत्न करत होते. गुडीपाडव्यानिमित्त आधी घेतलेल्या सभेमध्ये भोंग्याच्या वादावरुन त्यांनी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच काम केलं.
त्यावेळी एकही मुद्दा त्यांनी सामान्य जनतेच्या समस्सेचा घेतला नाही. मात्र काल झालेल्या सभेत बऱ्याच लोकांची अपेक्षा होती की, राज ठाकरे यावेळी तरी रोजगार, शिक्षण, शेती याविषयी बोलतील .
मात्र राजसाहेब यांनी ते नेहमीचच हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि इतर पक्षावर टीका केली. बोलत असताना राज ठाकरे यांनी शिवरायांच्या इतिहास बदनाम करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे याचा उदोउदो करत संभाजी ब्रिगेड वर टीका केली.
मंडळी राज ठाकरेंच्या बोलण्याची लोकांना कीव यावी अशी लहान मुलांसारखी त्यांनी काल वक्तव्य केली. ज्यामुळे राज ठाकरे यांना सोशल मीडियावर चांगलच ट्रोल करण्यात येत आहे. ते म्हणाले की शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडची स्थापना १९९९ नंतर केली.
ज्यामुळे महाराष्ट्रात दंगली वाढल्या. मात्र संभाजी ब्रिगेडची स्थापना मराठा सेवा संघाचे संस्थापक मा. पुरुषोत्तम खेडेकर यांनी १९९० मध्ये केली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडचा उल्लेख बी- ग्रेड असा केल्याने संभाजी ब्रिगेडला ते न पटण्यासारख आहे.
राज ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले की,
“संभाजी ब्रिगेडमधील लोकांच वाचन नाही. बाबासाहेब पुरंदरेमुळे शिवराय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले.”
यावर संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांना सडेतोड उत्तर देत जाहीर चर्चेच आव्हान केलं आहे. मात्र राज ठाकरे हे कधीच संभाजी ब्रिगेडच्या अभ्यासकांसोबत चर्चेला येत नाही. हे सुद्धा लोकांना माहिती आहे.