मंडळी संजय राऊत यांनी दिनांक १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस, मोहित कंबोज, निल सोमय्या अशा अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका केली होती.
मात्र भाजप नेत्यांकडून राऊत यांच्या आरोपांचा कडाडून विरोध होत आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपच्या साडे तीन नेत्यांचा उल्लेख केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर निशाणा साधला होता.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
“गेल्या कित्येक कालावधीपासून सातत्याने पोलिसांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भारतीय जनता पार्टी संघर्षाला कधीच मागे हटलेली नाही. आम्ही नेहमी लढत राहू आणि विरोधात बोलत राहू.”
अस ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगत होते. अशाच प्रकारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांचा विरोध केला आहे.
भातखळकरांचा राऊतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला. मात्र भारतीय जनता पक्षाने संजय राऊत यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. देवेंद्र फडणवीसानंतर आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर प्रतिउत्तर दिल आहे.
ते म्हणाले की,
” संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र आहे का? मुंबई महानगरपालिकेत सोडा, पण नगरपालिकेच्या निवडणूकीतही संजय राऊत कधी निवडून आलेले नाहीत. आमच्यासोबत युती केल्याशिवाय यांना कधी १०० जागा मिळाल्या नाहीत. संजय राऊतांना वाटत की, त्यांचं भांडूपंच घर आणि मातोश्री म्हणजे महाराष्ट्र आहे. गौरसमजात राहू नका. महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाहीत. राऊतांनी महानगरपालिकेची एक तरी निवडणूक लढवावी. आयुष्यभर तुम्ही राज्यसभेत गेला आहात. राऊत-उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाहीत.”