मंडळी गेल्या कित्येक महिन्यांपासून महराष्ट्रामध्ये चालू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा वाद सुटता सुटत नाही आहे. अलीकडे शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यावरून संपूर्ण महाराष्ट्र खळबळून उठला होता.
मात्र जवळपास १२० एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी लढता लढता आत्महत्या केली तेव्हा एवढा गदारोळ झाला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरणासाठी चालू असलेलं आंदोलन अध्यापही शांत झालेलं नाही.
महाराष्ट्र सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी उलट १०७ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच काम केलं. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी आता प्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले पडळकर?
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वादावरून जोरदार टीका केली आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हणाले की,
“पवारांच्या घरावर जो हल्ला झाला त्याच आम्ही समर्थन करत नाही. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानाला संपूर्णतः शरद पवार जबाबदार आहे. त्यांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला नाही, तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र माझ्या गाडीवरती हल्ला होऊनसुद्धा माझ्यावरतीच गुन्हा दाखल केल्या गेला. परत एकदा माझ्या गाडीवरती दोनशे ते अडीचशे लोकांनी हल्ला केल्यानंतर माझ्यावरच ३०७ चा गुन्हा दाखल केल्या गेला. शरद पवार हे नेहमी दुटप्पी भूमिका घेत असतात. कर्मचारी पवारांच्या घराकडे का चालून आली याचा अभ्यास शरद पवार यांनी का केला नाही? ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याला जबाबदार पवार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. एसटी कर्मचाऱ्यांच ५० वर्ष समर्थन शरद पवारांनी केलं. विलीनिकरणाची आषासुद्धा त्यांनीच दाखवली. मग आता पवार पाठ का फिरवत आहे ?”
असा चोख प्रश्न विचारत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. मात्र आता यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांच लक्ष लागून आहे.