मंडळी महाराष्ट्रातील राजकारणाने सध्या धार्मिक वळण घेतलं आहे. नवनवीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला चॅलेंज केलं आहे की आम्ही मातोश्रीवर हनुमानचालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही. राणा दाम्पत्य काल आपलं आव्हान पूर्ण करण्यासाठी गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल.
राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना
शिवसेनेने आपले हजारो कार्यकर्ते त्यांना रोखण्यासाठी मुंबई रेल्वेस्थानकावर तैनात केले होते. मात्र राणा दाम्पत्य हे शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी सरळ राणा दाम्पत्याच घर गाठलं. कालपासून राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसेना कार्यकर्ते वेढा देऊन बसलेले आहेत.
शेकडो पोलीससुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. मात्र आज राणा दाम्पत्य हे मातोश्रीवर जाण्याकरीता बाहेर पडणार हे कळताच शिवसेना कार्यकर्त्यांनी सर्व बॅरिगेट्स तोडून अपार्टमेंटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झडप झाली.
मुख्यमंत्री बिनकामाचे फुल पगारी – नवनवीन राणा
आज प्रसार माध्यमांशी बोलत असताना नवनीत राणा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर चांगलीच टीका केली. त्या म्हणाल्या की,
” माझी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे, की त्यांनी महाराष्ट्रामध्ये लक्ष द्यायला हवं. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बिनकामी फुल पगारी आहे. आमच्या कुटुंबाव्यक्तीरक्त अपार्टमेंटमध्ये इतर लोकसुद्धा राहतात. मात्र शिवसेनेने आपले गुंड या ठिकाणी आम्हाला त्रास देण्यासाठी पाठवलेले आहेत. पण त्यांनी एक लक्षात ठेवावं आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचल्याशिवाय परत जाणार नाही.”
अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणून कमाल केली आहे.
शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांकडून सूट – नवनीत राणा
मुंबईमध्ये राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी हजारो शिवसैनिक वेढा देऊन बसले आहे. कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. याची सर्व सूट शिवसैनिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अस नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलं.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- मुख्यमंत्री बिनकामाचे फुल पगारी – नवनवीन राणा
- मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य
- राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना
- देवाच नामस्मरण करत मातोश्रीवर येणार – नवनीत राणा
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir