असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सची (ADR) यांच्या नुसार…
कांग्रेस मधे सुद्धा बंड झाले पाच वर्षे मध्ये आजपर्यंत 170 आमदारांनी पक्ष सोडला कारण कदाचित कांग्रेस चा उतरता काळच असावा. किंवा न बदलणारी राजकीय रणनीती .
भारतीय जनता पक्ष मध्ये सुद्धा बंड झालेच आजपर्यंत 18 आमदारांनी पक्ष सोडला.
बंड म्हणावे तर योगी सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा देणारे स्वामी प्रसाद मौर्य यांचे उदाहरण आहेच.
बसपा आणि टिडीपी मध्ये सुध्दा बंड झालेत.
ज्या मुलायमसिंह यादव समाजवादी पक्ष उभा केला त्यांच्या घरातच बंड झाला आणि खुद्द अपर्णा यादव भारतीय जनता पक्ष मध्ये गेल्या..
ही बंडाचे राजकारण काही नवीन नाही आणि महाराष्ट्र मध्ये त्यातल्या त्यात शिवसेना साठी नाहीच नाही छगन भुजबळ सारखं जिवंत उदाहरण शिवसेना पुढे आहे..
परंतु मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात झालेल्या बंडाने पक्षाला नव्याने गरुडझेप घेण्याची ताकद सुद्धा उभी केली हा आजपर्यंत चा शिवसेना चा इतिहास आहे.
पण आताच्या क्षणाला जेव्हा पुन्हा राजकीय हालचाल होऊन बंड चे राजकारण तापते आणि शिवसेना मधून एक गट खुद्द वेगळा होतो तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री जेव्हा मी पद सोडावयास तयार आहे. मी पक्षप्रमुख म्हणून राजीनामा देतो असे उद्गार काडतात तेव्हा कुठे भुतकाळात जाऊन बघावं लागतं…
लहानपणापासून शिवसेना म्हटली की डोळ्यापुढे फक्त वाघ यायचा ज्यात मानवी चेहर्याचा उगम होता.. हाता रुद्राक्ष घातलेला , ज्या पक्षाच्या एका आवाजाने पाकिस्तान ला सिमेपार क्रिकेट टीम रोखायला भाग पाडले अश्या शिवसेना ची ही सद्य वाताहत बघणं अशक्यच..
पण शिवसेना मध्ये आता झालेल्या बंड ला संपवण्यासाठी तत्परता दाखवण्या एवजी जणू तो बंड आणखी बंडखोर व्हावा अशीच वाक्य संजय राऊत नी आता पर्यंत दिली..
जी लोक बंड करून बाहेर पडली त्यांना समजून घेण्यापेक्षा त्यांना कामाख्या देवी ला बळी अर्पण करण्याची भाषा सुरू झाली.
जेव्हा प्रतिशिवसेनेने दिली होती बाळासाहेब ठाकरे यांना धमकी…
बंड शांत करणे हे आपल्या सहकारी पक्ष कांग्रेस कडून तरी राऊतांना कळायला हवं !! सचिन पायलट चा बंड शांत करण्यापासून ते हार्दिक पटेल च्या बंड ला जेवढे कमी महत्त्व मिळेल तेवढे मिळवण्यासाठी शांत राहणं .
आणि मग बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांनी सरळ मुळ मुद्दा पकडला #हिंदुत्व !!
पण पुन्हा या मुद्द्यावर एकत्र येण्या एवजी संजय राऊत यांचा वेगळाच विषय सुरू झाला…😐
शिवसेना जेव्हा तयार झाली तेव्हा तीची मुळ विचारधारा ही हिंदुत्व नव्हती तर मराठी माणूस होती… नंतर बदलत्या राजकारणाने शिवसेना ची ओळख हीच हिंदुत्व केली.
पण भाजप सोबत युती तुटताच. ( भाजप सोबत सुद्धा युती काही हिंदुत्व साठी तुटलेली नाही आणि भाजप ने सुद्धा काही हिंदुत्व म्हणून खूप मोठे मन नव्हते केले… दोन्ही कडे खुर्ची हाच विषय होता..) शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली महाविकास आघाडी जीच्या मुळ बेस चा आणि शिवसेना च्या मुळ विचारधारा चा उत्तर दक्षिण होता आणि त्या नंतर कंगणा रणावत पासून ते आज शिंदे पर्यंत एक एक करत शिवसेना कशी अहिंदू आहे हे दाखवण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केला.
कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता
त्या पैकी किती मुद्दे धड होते आणि किती चिंध्या हेही महाराष्ट्र ने बघितलच..
कोविड च्या वेळी दोन वर्षे राज्य सरकार मध्ये आणि केंद्र सरकार मध्ये जे सुरू होते तेव्हा पण सर्व बघतच होते…
त्या नंतर सुरवात पासून सुरू असलेल्या हिंदुत्व या मुद्द्यावर आघाडी सरकारने पांघरूण टाकले हे खरेच आहे आता याचे कारण शरद पवार आहे की आघाडी मध्ये असलेले कांग्रेस हे आघाडी लाच माहिती..
पण या सर्व मध्ये एक हवा आणखी उडते आहे ती म्हणजे शिवसेना संपणार का ?
तर शिवसेना कधीच संपणार नाही गड्या !!
भारतातील केडर संघटना, ज्याचं नाव दंगल रोखण्यासाठी एक वेळ पुरेसे होते ती संपणे अशक्य आहे , विचारधारा कुठल्या पक्षाने आजवर बदलली नाही ?? काळानुसार अनेक पक्ष बदलत गेले बदलत आहे म्हणून ती संपली नाही ,, मग शिवसेना तर राजकारणाचा एक असा पक्ष आहे जो विचार म्हणून हिंदुस्थानात अधिक माहिती आहे…. मग ती संपणार कशी? आणि ती संपायला सुद्धा नको फक्त
पुन्हा त्याच तडाख्याने आता शिवसेनेच्या हिंदुत्व भगव्या वाघाने पुन्हा आपल्या ओळखीसह ताकदीने झेप घ्यावी एवढीच मापक अपेक्षा..
बाकी
मेरा हर गुन्हा मेरा विचार बनके लाखो लोगोके खुन मे दौडेगा जिसके हर कतरे मे जिंदा रहेगा बाल केशव ठाकरे…🚩
अक्षय चंदेल
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- उदय सामंत गेले की पाठवले
- बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून
- कार्यकर्ताच राजकीय नेत्यांचा खरा नेता
- दिघेंच्या अंतिमयात्रेमध्ये का गेले नाही बाळासाहेब ठाकरे?
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir
काय झाडी…
काय डोंगर….
काय हाटेल…..
सगळ कस ok मध्ये चालू आहे.
😂😂😂👌