शिवसेनेचे चाणक्य असणारे संजय राऊत एकेकाळी गुंड पत्रकार म्हणून ओळखले जायचे…

गुंड पत्रकार

मंडळी शिवसेनेचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत हे नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बहुचर्चित असलेले राजकीय नेते आहे. मात्र संजय राऊत यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश केव्हा व कसा झाला?

 

व शिवसेनेमध्ये येण्यापूर्वी ते काय करत होते? याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी संजय राऊत यांचे वडील हे शिवसैनिक होते.

 

वीर भगतसिंगांची फाशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी

 

संजय राऊत यांनी आपलं पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये संपादकीय लेख लिहून गुन्हेगारी क्षेत्रातल्या क्राईम स्टोरी लिहल्या आहेत.

 

ज्यामध्ये दाऊद इब्राहिम, मन्या सुर्वे यांसारख्या अनेक कुख्यात गुंडांच्या स्टोरी समाविष्ट आहेत. नंतर त्यांनी लोकप्रभा या वृत्तपत्रामध्ये काम केले.

 

लोकप्रभा या वृत्तपत्रामध्ये संजय राऊत यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिफारसीवरून नोकरी मिळालेली होती. तेव्हाची सर्वात महत्वाची घटना म्हणजे रमा नाईक या कुख्यात गुंडांच्या एंन्काऊंटरची स्टोरी कव्हर कण्याची जबाबदारी लोकप्रभाचे संपादक माधव गडकरी यांनी संजय राऊत यांना दिली होती.

 

आणि ही जबाबदारी राऊतांनी निर्भीडपणे पार पाडली. त्यांचे संपादकीय लेख हे निर्भीड आणि सडेतोड असायचे. त्यामुळे त्यांची ओळख गुंड पत्रकारम्हणून निर्माण झाली होती. त्यानंतर राऊतांच्या या सडेतोड लिखाणाला बाळासाहेब ठाकरे यांनी वाव दिला.

 

एकनाथ शिंदेंच्या पाया पडण्यावरून मला ट्रोल करणारी लावारस कारटी – अमोल मिटकरी

 

व त्यांना बाळासाहेबांनी सामनाचा संपादक केले. ज्या ताकदीने बाळासाहेब ठाकरे हे सामनामध्ये संपादकीय लेखांमधून आपली भूमिका मांडायचे.

 

तेच लिखाण कौशल्य त्यांना संजय राऊत यांच्यामध्ये दिसलं होत. त्यानंतर संजय राऊत यांनी १९९२ साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 

 

राजसभेवर खासदार

 

शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय राऊत यांच्या लिखाणाला चांगलाच वाव मिळाला आणि शिवसेनेमध्ये त्यांचं राजकीय नेता म्हणून चांगलच वजन निर्माण झालं. २००४ मध्ये त्यांना शिवसेनेतर्फे राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली.

 

आणि ते निवडूनही आले. त्यानंतर संजय राऊत यांनी राजकीय क्षेत्रात कधीच मागे वळून बघितलं नाही. आज ते शिवसेनेचे चाणक्य म्हणून ओळखले जातात.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *