ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क देण्यात याव – ऍड. नईम शेख

नमाज

मंडळी एकीकडे हनुमान चालीस्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चिघळलेलं असतांना औरंगाबाद येथील वकील नईम शेख यांनी महाराष्ट्र सरकारला ईदला नमाज पठणासाठी शिवाजी पार्क खुल करण्यात याव अशी मागणी केली आहे.

 

सद्ध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील राजकारण हे सध्या जातीय द्वेष समाजामध्ये निर्माण करणार सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नईम शेख यांची शिवाजी पार्कवर नमाज पठणासाठी मागणी एक समतावादी निर्णय महाराष्ट्र सरकारकडून होण्याची अपेक्षा आहे.

 

ब्राम्हण महासंघाच्या महिलांना डोक्यावर घेऊन गेलो असतो – रुपाली पाटील

 

या पार्श्वभूमीवर नईम शेख यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलेलं आहे. मुंबई परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आहेत. त्यांना नमाज अदा करायला दुसरी मोठी जागा नाही त्यामुळे शिवाजी पार्क देण्यात याव अशी त्यांची मागणी आहे.

 

नईम शेख यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असतांना सांगितलं की,

 

” मी महाराष्ट्र शासनाकडे शिवाजी पार्कवर नमाज पठणाकरिता परवानगी मागितलेली आहे. दिनांक २२/४/२०२२ ला मी शासनाला त्यानंतर महानगरपालिकेला पत्र दिलेल आहे. मुंबईमध्ये जागेची कमी असल्याकारणाने रस्त्यावर नमाज पढावी लागते त्यामुळे आम्ही शासनाकडे कायदेशीर परवानगी मागितलेली आहे. शासनाने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा आणि आम्हाला दरवर्षी शिवाजी पार्कवर नमाज पठणासाठी परवानगी द्यावी अशी मी विनंती करतो.”

 

अस नईम शेख यांनी म्हटलं आहे. 

 

३ मेपर्यंत मस्जिदींवरचे भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू – दिलीप दातीर

 

सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये चालू असलेला धार्मिक वाद पाहता महाराष्ट्र शासन मुस्लिम बांधवांना शिवाजी पार्कवर नमाज पठणासाठी परवानगी देणार का? हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *