मंडळी राज्यसरकर आणि केंद्र सरकारमध्ये वादावादीच राजकारण पेटन ही आता नवीन गोष्ट राहलेली नाही. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता नसल्याकारणाने केंद्र सरकार नेहमीच महाराष्ट्र सरकारला मदतीच्या वेळी योग्य तो प्रतिसाद देत नाही. अशी टीका नेहमी राज्यसरकार केंद्र सरकारवर करत असते. मात्र महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते नेहमीच केंद्र सरकारची पाठराखण करत असतात .
तसच काही वादावादीच राजकारण केंद्र सरकार आणि राज्यसरकरमध्ये पेटताना दिसत आहे. कोरोना काळामध्ये केंद्र सरकारने अपेक्षित मदत न केल्यामुळे महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती हाताळणे कठीण झाले होते. अस विधान महाविकास आघाडीने केले होते. मात्र यावर प्रतिउत्तर देतांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्यसरकरवर जोरदार टीका करत केंद्र सरकारची पुन्हा पाठराखण केली आहे.
काय म्हणाले केंद्रीय मंत्री?
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी महाराष्ट्र सरकारवर कडाडून टीका करत म्हटलं की,\” आजचा दिवस हा देशासाठी महत्वाचा दिवस आहे. भारत समृद्ध होण्यासाठी, मोदींच्या नेतृत्वाखाली देश विश्वगुरु बनण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. महाविकास आघाडी नेहमीच चुकीचे बोलते. स्वतः काही करत नाही फक्त केंद्राकडे बोट दाखवणे हेच त्यांचे काम आहे.
कोविडच्या काळात महाराष्ट्र सरकारने केलेली एक गोष्ट दाखवावी. केंद्र सरकारने केलेल्या १० गोष्टी मी सांगू शकतो. आम्ही आमची लस देऊ असे महाराष्ट्र सरकारने संगितले होते, पण त्यांनी कोणती लस दिली? केंद्राने १५० कोटी लोकांसाठी लस दिली. मात्र महाविकास आघाडीने काही केलेले नाही.\” असे ते प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.