तर त्या मुख्यमंत्र्याला कन्याकुमारीतील तिन्ही समुद्रात फेकून देऊ- रामदास आठवले

               मंडळी राजकारणामध्ये नेत्यांनी एकमेकांची खिल्ली उडवणे ही काही नवी गोष्ट राहलेली नाही. त्याच आणखी एक उदाहरण म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि भाजप नेते रामदास आठवले यांच्यात पेटलेला राजकीय वाद आहे. भाजप सरकारला हटवून बंगालच्या उपसागरात फेकून देण्याची गरज आहे, अस वक्तव्य तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केलं होतं.

               अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना निराशा व्यक्त करत त्यांनी ही टीका केली होती. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरदृष्टी नसेलेले देखील म्हटलं होतं. देशात नेतृत्व बदलाची गरज असल्याचे सांगत या विषयावर लवकरच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार अस सांगत होते. मात्र राव यांच्या या विधानाचा भाजपने चांगलाच विरोध करत त्यांना प्रतिउत्तर दिल आहे. 

काय म्हणाले आठवले?

          तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजपला बंगालच्या उपसागरात फेकून देण्याचं वक्तव्य केल होत. त्यांनी अस वक्तव्य करणं योग्य नाही. जर ते भाजपला बंगालच्या उपसागरात फेकून देऊ अस म्हणत असतील तर, आम्ही देखील त्यांना कन्याकुमारीतील तिन्ही समुद्रात फेकल्याशिवाय राहणार नाही. 

          अस प्रतिउत्तर भारतीय जनता पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी दिल आहे. आता यावर के चंद्रशेखर राव काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. देशाला योग्य नेतृत्व लाभाव यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेण्याच वक्त्यव्यसुद्धा त्यांनी केलं होतं. पुढे हे प्रकरण कुठल वळण घेईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *