भारत देशाच्या इतिहासात अनेक युद्ध झाले काही हे हिंसक होते तर काही लढे हे गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाने झाले.
विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये क्षुल्लक कारण पुढे करत अनेक समाजकंटकांनी भारतात फुट पाडण्याचे डावपेच रचल्याचे दिसून येते पण भारत हा धर्मनिरपेक्ष आणि जातीभेदाला नाकारून विकासाच स्वप्न पाहत जगू इच्छितो
पण राजकारण्यांनी आणि समाजकंटक लोक यांच्यामार्फत होणार कर्मकांड हे हिंसेंचे प्रमाण ठरते. भूतकाळात मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतर प्रसंगी उद्भवलेला वाद
आणि सध्याच्या दिवसांमध्ये गाजलेला छत्रपती संभाजीनगर नाव दिल्यामुळें तयार झालेले वातावरण हे चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या राजनितिक इतिहासानुसार वाद होने संभाविक आहे पण ,छत्रपतींच्या नावाने वाद उद्भवणे ही खूप संतापजनक आणि लाजिरवाणी बाब आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या जीवाच राण करून या जुलमी मोगलांच्या ताब्यातून आपली सुटका करून या राज्याच स्वराज्य केल त्याच महाराजांच्या पुत्राने जीवाची आहुती दिली
पण आपल्या धर्माचा रक्षण केल आणि जर त्याच महाराजांच्या नावाने जर आपल्या शहराला एक नवी ओळख मिळत असेल तर यात आपले सौभाग्य आहे पण समाजकंटक लोकांकडून याला सुद्धा विरोध होतोय.
सध्याच सरकार हे नक्कीच फुटाफूटिच जरी असलं तरी लोकहितार्थ निर्णय घेणं आणि लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यात पुरेपूर कंबर कसताना हे सरकार दिसतंय .
हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला धरून महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना या विषयाला हात लागला आणि भाजपा आणि शिंदे गट यांच्या सहकार्याने हे साध्य झाल
नक्कीच जनमत सुद्धा या निर्णयाच समर्थन करून प्रशंसा करत आहे पण काही समजकंटक या नामांतराला विरोध करून पुन्हा औरंगाबाद करू इच्छितात कदाचित ते विसरले असावेत औरंगजेब हा किती क्रूर आणि निच्च विचारसरणीचा होता .
जात,पात आणि धर्म बाजूला ठेवता भारताचा सुजान नागरिक या नात्याने तरी मी या निर्णयाशी सहमत आहे आणी तस पाहता अस ही खासदार इम्तियाझ जलील यांचं आंदोलन पाहून त्यात त्यांचाही पूर्णतः समावेश दिसत नाही
लोकांनकडून मिळणारा अल्पप्रतिसाद आणि आंदोलनापेक्षा त्यांच्या भोजनाच्या पंगतीचेच जास्त चर्चे आहे यावरून कळत दिशाहीन व्यक्तीकडे लोकशाहीच प्रतिनिधित्व दिल्यावर काय होत !
नक्कीच लोकांनासुद्धा नामांतर हवं होतच आणि जे झाल ते उत्तमच कारण ज्या औरंगजेबाच्या काळात स्त्रिया सुरक्षित नव्हत्या त्या माणसाच नाव इतिहासातसुद्धा नसायला हवं
तर त्याच व्यक्तिच्या नावाने एखादे शहर वसवणे हे आपल्या इतिहासाला मारकच होते त्यामुळें असल्या खासदार अथवा ठराविक लोकांच्या समूहाने विरोध जरी केला तरी यात फारस लक्षदेण्या इतपत महत्वाच अस काहीच वाटत नाही.
‘हे स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा होती ‘
पण ते टिकवणे ही आपली जबादारी आहे 💯
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता
- लोकशाहीतील हुकूमशाह !
- शिवसैनिक कधी फुटतो का ?
- लाल सलाम !
- माजी राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख – पोलिटिकल वजीर
तुम्ही आम्हाला फेसबूक वर सुद्धा फॉलो करू शकता
Facebook : Political Wazir