सौरव गांगुली करणार भाजपमध्ये प्रवेश

सौरव गांगुली

मंडळी एकीकडे महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि भोंगा प्रकरण सुरू असताना महाराष्ट्राबाहेर भाजपच आकर्षण भारतीय क्रिकेटपटूंना लागलं आहे. भारतीय क्रिकेटपटूंना राजकीय क्षेत्राच आकर्षण असणं आणि त्यांचं राजकीय क्षेत्रात कार्यरत असणं ही काही नवीन गोष्ट नाही.

 

नवजोतसिंग सिद्धू यांनी भाजपा आणि काँग्रेसकडून केलेलं राजकारण जनतेला चांगलच माहिती आहे, तर दुसरीकडे गौतम गंभीर व मनोज तिवारी या भारतीय क्रिकेटपटूंनी भाजपमध्ये घेतलेला प्रवेशसुदधा इथल्या जनतेला माहिती आहे.

 

उध्दव ठाकरेंनी योगींकडे ट्युशन क्लास लावावा- आशिष शेलार

 

मात्र भारतीय क्रिकेट क्षेत्रातील एक गाजलेलं नाव ज्याने सर्वांना चकित करून सोडलंय. तो म्हणजे क्रिकेट क्षेत्रात दादा म्हणून ओळखला जाणारा सौरव गांगुली. सौरव गांगुली सध्या BCCI चा अध्यक्ष आहे. 

 

त्याचे भाजपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत आधीपासूनच दिल्या जात होते. मात्र या गोष्टीला आता शिक्कामोर्तब करण्याचं काम केलंय ते भारतीय देशाचे केंद्रीय गृहमंत्री व भाजपा नेते अमित शहा यांनी.

 

राज ठाकरेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे- धनंजय मुंडे

 

अमित शहा हे पश्चिम बंगाल दौऱ्यावर असतांना दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या कलकत्ता येथील निवासस्थानी भेट दिली. या भेटीमुळे सौरव गांगुलीच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चांनी आता चांगलाच जोर धरला आहे.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

 

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *