शककर्ते शिवराय या ग्रंथ वर.व्याख्यान झाले आणि शिवकथाकार विजयराव देशमुख यांना एका मित्राने त्यांच्या कडे आमंत्रण दिले.
विजयराव या गोष्टी पासून पुर्णपणे दुर होते की ही मित्रभेट त्यांच्या आयुष्यातील एक वर्ष अज्ञात अश्या मार्गावर नेणार होते.
मित्राकडे जाताच त्यांच्या पुढे एक लहान चित्र आले…
दोन कैद्यांना उंटावर टाकले होते ज्यांना बघण्यासाठी अवघे लोक गोळा झाले होते…
एक दगड घेऊन बंद्याना मारत होते.. , अंगावर भाले टोचल्या जात होते .
विदारक चित्र बघताच विजयरावांनी मित्रापुढे प्रश्न उपस्थित केला…
कोणाचे चित्र आहे हे ?
आणि तसाच उत्तर सरसरून विज कोसळावी तसा विजयरावांच्या ज्ञानेंद्रियांवर कोसळला..
शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आहे हे…
हे उत्तर विजयरावांच्या ह्रदयात टोचले…
हा तोच शंभु ज्याने नवव्या वर्षी मुघलांच्या मनसबाची दौलत आपल्या नावे केली होती, हा तोच शंभु ज्याने सौराष्ट्र सिमावर भगवा ध्वज फडकवला होता…
शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज : एक श्रापीत राजहंस
मग हा शंभु असा बंदीवासात कसा…
या शंभु बद्दल गलिच्छ खूप ते ऐकले नेमका शंभु तसाच आहे ??
आणि मग सुरू झाला एक वर्षाचा एकांतवास , पत्र, ग्रंथ मध्ये सुर्योदय व्हायचा आणि त्यातच सुर्यास्त..
आणि मग एक ससंदर्भ ग्रंथ पुढे आला ज्याने वढू तुळापूर ला भव्य अशी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती चे समारोह केले…
प्रत्येक शंभुद्वेष्टाच्या तोंडावर झापड सुद्धा या ग्रंथातून मारल्या गेली…
जर विजयरावांनी सुद्धा असेच सह्याद्री ला ओरडू ओरडू विचारले असते कसा होता माझा राजा ?
तर सह्याद्री ने सुद्धा उत्तर दिले असते..
राजा डोक्यात घेतलं की डोक्यावर मी स्वतः नाचवेल तुला…
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या शी आपल्या भावना जरी जुडल्या असल्या तरी वास्तव समोर ठेवून त्यांच्या चरित्र चे अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे..
नाही तर भावनिक शिवभक्तीच्या नावाने राजे जयंती पुर्ती मर्यादित राहतील…
आणि आमचा राजा जयंती पुरता नाही तर जिवंत असे पर्यंत आमचा मार्गदाता चरितार्थ आहे…
आणि तरीही प्रश्न असेलच जर कसा होता माझा राजा
तर शिवभारतात उंबरखिंड प्रसंगी लिहिलय..
अतिसुंदर , उंच मान , रूंद छाती ,
धिप्पाड शरीर , महाबलवान ,
पाठीवर दोन्ही बाजुस बाणांचे दोन भाते जणु गरुडाचे पंख ,
रत्नजडित अलंकार घातलेल्या पांढर्याशुभ्र घोड्यावर ,
गरूडावर श्री हरी विष्णू बसावे तसे आरूढ होऊन . अंगात अभेद्य कवच , मस्तकावर उत्कृष्ट शिरकाण , सोबत प्रचंड ढालीने शोभून उठणारा दुपट्टा परिधान करून…. श्री शिवशंकराहुन उग्र ,अग्नीदिव्य , वायुपेक्षा बलवान , इंद्राहुनद समर्थ , वरुणापेक्षा नीतिज , चंद्रापेक्षा आल्हाददायक , आणि मदनापेक्षा अजिंक्य , माथ्यावर शिवगंध जणू कैलासाचे रुद्र… असा होता आमचा राजा…
मर्यादेय विराजते…
✍️अक्षय चंदेल ©
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- जेव्हा टीसीने पकडली होती आनंद दिघे यांची कॉलर…
- म्हणून बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत…
- जेव्हा गडकरी- फडणवीस वादाचा झाला होता गौप्यस्फोट
- उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…”
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir