मंडळी बरेच लोक म्हणतात राजकारण हे वाईट असत कारण राजकीय नेते कधी स्वतःच्या बापाचेसुद्धा झाले नाहीत,तर जनतेचे काय होणार? मात्र काही नेते असे असतात जे निस्वार्थीपणाने जनतेसाठी अविरत झटत असतात.
याच उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आरआर आबा उर्फ रावसाहेब रामराम पाटील. त्यांना सगळे प्रेमाने आबाच म्हणायचे. आबा यांचा जन्म १ ऑगस्ट १९५७ रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्क्यामधल्या अंजनी या गावी अत्यंत गरीब कुटुंबामध्ये झाला.
आबा लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होते. इयत्ता ४ थी आणि ८ वीमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. तर इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेत ते केंद्रात पहिले आले होते. बऱ्याच लोकांनी त्यांना पुढे सायन्स फिल्डमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला.
कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याकारणाने त्यांनी आर्टला प्रवेश घेतला. मात्र शिक्षण पूर्ण करता करता पैशांची गरज पडेल आणि त्यासाठी नोकरी केली पाहिजे म्हणून त्यांनी शेजारच्या एका कारखान्यामध्ये नोकरीसाठी धाव घेतली.
आबांची उंची लहान असल्याकारणाने त्यांची टिंगल उडवून त्यांना कारखान्यातील वॉचमनची नोकरी नाकारण्यात आली. नंतर आबांना ‘कमवा आणि शिका’ या योजनेबद्दल माहिती मिळाली आणि त्यामधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
आबांना जनतेची मदत करण्यात त्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्यात लहानपणापासूनच गोडी होती. नंतर ते वसंतदादा पाटील यांच्या सहवासात राहले. सोबतच यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शनसुद्धा त्यांना लाभले.
तासगाव तालुक्यामध्ये आबांची लोकप्रियता पाहून काँग्रेस पक्षाने त्यांना १९९० ला विधानसभा लढवण्याचे सुचवले. आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये आबा आमदार झाले.
गोपीनाथ मुंडे सामान्यांचा असामान्य नेता
आबांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. १९९० ते २०१५ पर्यंत ते तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. दोन वेळा महाराष्ट्राचे गृहमंत्री, एकदा ग्रामविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राला चालना देण्याचं काम केलं.
मात्र २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई येथील ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असतांना वादग्रस्त विधान केल्याने त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
अखेर कर्करोगाने लीलावती रुग्णालयात आबा यांचे १ फेब्रुवारी २०१५ ला निधन झाले. मात्र आबा आजही आपल्या कर्तबगार व्यक्तिमत्वाने अजरामर आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- केजरीवाल यांनी २०१४ ला मुख्यमंत्री पदाचा का दिला होता राजीनामा?
- जेव्हा बाबासाहेबांनी दिलेली बातमी केसरीमध्ये छापण्यास टिळकांनी नकार दिला…
- आमदाराच्या रुपात कोरोना रुग्णांनी बघितला होता देव
- कारागृहात असतांना झाले आमदार
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir