मंडळी स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्थापनेपासून या महाराष्ट्राला आतापर्यंत एकूण २० मुख्यमंत्री लाभले आहेत. प्रत्येक मुख्यमंत्र्याची एक विशिष्ट कारकीर्द राहलेली आहे.
मात्र मुस्लिम समाजाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभन म्हणजे एक नवलच म्हणावं लागेलं. हो मंडळी. आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री मा. अब्दुल रहेमान अंतुले.
तर मंडळी झालं असं की, भारतीय देशामध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर जनता दलाच सरकार हे केंद्रामध्ये आलं. मात्र २ वर्षांपेक्षा जास्त काळ हे सरकार टिकू शकलं नाही. त्यानंतर पुन्हा इंदिरा गांधींच सरकार आलं.
१ रुपया पगार घेणारी मुख्यमंत्री, अभिनेत्री ते तामिलनाडूच्या अम्मापर्यंतचा प्रवास
आणि त्यांनी सर्वात पहिलं काम केलं ते म्हणजे महाराष्ट्रातील शरद पवार यांचं पुरोगामी लोकशाही दलाच सरकार बरखास्त करण्याचं. शरद पवार यांच सरकार कोलमडून पडल्यानंतर महाराष्ट्राला अब्दुल रहेमान अंतुले हे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री म्हणून लाभले.
मात्र अंतुलेंच्या मुख्यमंत्री होण्यावर महाराष्ट्रातील इतर काँग्रेसचे नेते फारसे खुश नव्हते. पण अंतुले यांची महाराष्ट्रविषयी निष्ठा आणि जनतेविषयी जो कळवळा होता तो वेगळं संगण्याची गरज नाही.
ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी आर्थिक परिस्थितीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची ५० कोटी रुपयांची कर्जमाफी केली. यावर रिजर्व बँक ऑफ इंडियाने त्यांना खडसावले होते.
मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी रद्द होणार नाही. या आपल्या निर्णयावर ते अखेरपर्यंत ठाम राहले होते. १९८० मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते.
२००३च्या महाबळेश्वर अधिवेशनात अस काय घडलं की ठाकरे घराण्यात फूट पडली?
झालेल्या आरोपांवरून राजीनामा
मंडळी अंतुले यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीला जवळपास दोन वर्षे होत आली असतांना त्यांच्यावर सिमेंट घोटाळाप्रकरणी आरोप लावण्यात आले.
त्यांच्यावर कोर्टामध्ये खटला दाखल करण्यात आला. महाराष्ट्रात सिमेंटची टंचाई निर्माण झाली असता त्यांनी सरकारी मालमत्तेमधून सिमेंट पुरवल्याचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते.
अखेर मुख्यमंत्री पदाच्या दोन वर्षीय कार्यकाळानंतर १९८२मध्ये त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र १० ते १५ वर्षानंतर त्यांची या खटल्यातून सुटका झाली.
अब्दुल रहेमान अंतुले यांनी महाराष्ट्रातील येणाऱ्या राजकीय आणि सामाजिक पिढीसमोर उत्तम नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- “इंदिरा गांधींकडे जाऊ नका” पवारांनी यशवंतराव चव्हाणांना दिला होता सल्ला?
- जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबेंच्या हत्येनंतर आरोपी काय म्हणाला?
- जेव्हा गडकरी- फडणवीस वादाचा झाला होता गौप्यस्फोट
- मोदी-शहांनी फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला?
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir