राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच काम केलं आहे – नाना पटोले

नाना पटोले

मंडळी एकीकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी झुंज बघायला मिळत असतांना दुसरीकडे महाविकास आघाडीमधली काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील बाचाबाची आता चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीमध्ये खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे.

 

आमदार चरण वाघमारे यांची भाजपमधून हकालपट्टी

 

भंडारा जिल्ह्यातील पंचायत समितीच्या निवडणूकांमध्ये भाजपसोबत युती करून दगा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलं असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असतांना

 

त्यांनी सांगितल की,

 

” मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने भंडाऱ्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या निवडणुकांवेळी भाजपसोबत युती करून काँग्रेसच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. मित्रता केली तर ती इमानदारीने टिकवता आली पाहिजे. मी प्रफुल पटेल यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी आमच्या गोष्टीला मान दिला नाही. भंडारा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आणि जिल्हाउपाध्यक्षाच्या निवडणूकीवेळी आम्हाला अपेक्षा होती की राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यापुढे प्रस्ताव ठेवतील. मात्र त्यांनी असे काहीही केलेले नाही.”

 

अस नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

 

जोपर्यंत राज ठाकरे मनसे कार्यालयात येत नाही तोपर्यंत मीसुद्धा तिथे जाणार नाही – वसंत मोरे

 

 

काँग्रेसला भाजप आमदाराने साथ दिली – नाना पटोले

 

 

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की,

 

” एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला दगा दिला असता दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील भाजपचे आमदार चरण वाघमारे यांनी आम्हाला साथ दिली आहे. त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की, भाजपमध्ये बहुजन समाजाला कशाप्रकारे पडद्याआड ठेवलं जातं.”

 

अशी रोखठोक भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली.

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *