मंडळी राणा (Rana) दाम्पत्य काल मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याच्या भूमिकेवरून गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल होत. त्याचक्षणी हजारो शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला अडवण्यासाठी त्यांच्या घराभोवती वेढा घातला आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
राणा दाम्पत्यावर शिवसैनिक इतके चिडलेले होते, की राणा दाम्पत्याचे हातपाय तोडून त्यांना परत पाठवू अस पण त्यांनी बजावलं होत. त्यासाठी शिवसैनिकांनी रुग्णवाहिकासुद्धा राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी आणली होती. मात्र राणा दाम्पत्याने हे संपूर्ण वातावरण चिघळवून शेवटी माघार घेतल्याचं जाहीर करताच संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांची टीका होत आहे.
शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणली
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा राणा दाम्पत्याला दिलासा देत म्हटलं होतं, की त्यांना सुरक्षित घरी परत पाठवण्याची जबाबदारी ही राज्यसरकारची आहे. मात्र नागपूर दौऱ्यावर असलेले शिवसेना प्रवक्ते यांनी राणा दाम्पत्याचे चांगलेच कान टोचले. प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की,
” राणा दाम्पत्यांनी लायकीमध्ये रहावं. त्यांच्या अशा कामगिरीमुळे शिवसैनिकांचा उद्रेक उडेल. कुणाच्यातरी पाठबळाने तुम्ही जर मुंबईत येऊन मातोश्रीवर घुसत असला, तर शिवसैनिक काय स्वस्त बसतील? तुम्ही जर लक्ष्मण रेषा उलांडाल तर शिवसैनिकसुद्धा तुमच्या घरापर्यंत घुसतील.”
अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली होती.
राणा दाम्पत्यांनी लायकीत रहावं – संजय राऊत
प्रधानमंत्र्यचा मुंबई दौरा पाहता माघार घेतली – रवी राणा
राणा दाम्पत्यानी मुंबईत घातलेला हनुमान चाळीसाचा गोंधळ हा एक स्टंट होता. हे जनतेला चांगलच कळलं आहे. मात्र रवी राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितल की,
“उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब मुंबई दौऱ्यावर असल्याकारणाने आम्ही इथे माघार घेत आहोत.”
यावरून सर्व जनतेच्या लक्षात आलं आहे की राणा दाम्पत्याने केलेला हा एक प्रकारचा स्टंट होता.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- मुख्यमंत्री बिनकामाचे फुल पगारी – नवनवीन राणा
- मुख्यमंत्री हे पनौती आहे – राणा दाम्पत्य
- राणा दाम्पत्य मातोश्रीवरून पायाने परत जाणार नाही – शिवसेना
- देवाच नामस्मरण करत मातोश्रीवर येणार – नवनीत राणा
FB : https://www.facebook.com/PoliticalWazir