ब्राम्हण महासंघाच्या महिलांना डोक्यावर घेऊन गेलो असतो – रुपाली पाटील

रुपाली पाटील

मंडळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आला आहे तो म्हणजे इस्लामपूरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या सभेत अमोल मिटकरी यांनी मांडलेल्या भूमिकेवरून. मिटकरी यांनी आपल्या भाषणामध्ये एक मुद्दा सांगत असतांना म्हटलं की,

” मी एका गावामधल्या लग्न समारंभात गेलो असता तिथे एक महाराज मंत्र म्हणत होता आणि कन्यादान करत होता. पण कन्या ही दान करायची गोष्ट नाही व त्या महाराजाने जो मंत्र म्हटला होता, त्याचा अर्थ असा होता की, मम भार्या समर्पयामि म्हणजेच माझी बायको घेऊन जा.”

अमोल मिटकरींनी वापरलेल्या मंत्रावरून ब्राम्हण महासंघाच आंदोलन

अस अमोल मिटकरी यांनी म्हटलं होतं. मात्र अमोल मिटकरींच्या या वक्तव्याचा ब्राम्हण महासंघाने कडाडून विरोध करत पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापुढे आंदोलन सुरू केलं. ब्राम्हण महासंघाच्या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसपुढे अक्षरशः गदारोळ केला.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी ब्राह्मण महासंघाच्या सर्व महिलांना चांगलच धारेवर धरल. त्या म्हणाल्या की,

” कोणाला कुठल्या वक्तव्याचा विरोध करायचा आहे तो त्यांनी लोकशाही मार्गाने करावा. ब्राम्हण महासंघाच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरुष कार्यकर्त्यांच्या अंगावर गेल्या. मग स्वतः आरडाओरडा करायचा की राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी आमच्यावर हात घातला. आम्हीसुद्धा जिजाऊंच्या लेकी आहोत. पण ही आमची संस्कृती नाही. अमोल मिटकरींनी ब्राम्हण महसंघाला उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करायची गरज नाही. आम्ही कार्यल्यासमोर लेट पोहचलो नसतो तर ब्राम्हण महासंघाच्या महिलाना डोक्यावर उचलून घेवुन गेलो असतो.”

अशी बोचरी टीका त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना केली. 

राज ठाकरेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे- धनंजय मुंडे

अरेरावी केली तर कार्यक्रम करू – रुपाली पाटील

मंडळी अमोल मिटकरींनी इस्लामपूर येथे झालेल्या सभेत मांडलेल्या भूमिकेबद्दल चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील प्रसार माध्यमांशी बोलत असताना पुढे म्हणाल्या की,

“ब्राम्हण महासंघाने निषेध व्यक्त करायचा असेल तर तो आमच्या परिसरात करू नये. जास्त आरडाओरडा केला किंवा अरेरावी केलो तर कार्यक्रम करू.”

अशी ठाम भूमिका रुपाली पाटील यांनी मांडली.

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *