मंडळी गेली कित्येक वर्षे झाले राज ठाकरे हे राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय नेते आहे. मात्र त्यांना राजकीय क्षेत्रात फारस यश आलेल नसल्याकारणाने आता त्यांनी समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या मनसुब्याने धार्मिक राजकारण करायला सुरुवात केली आहे.
मुंबई आणि ठाणे येथे झालेल्या त्यांच्या सभेत त्यांनी सर्व मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याच आव्हान महाराष्ट्र सरकारला केलं होतं. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील सर्व मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वात जास्त आनंद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना झाला आहे.
राज ठाकरेंना संभाजी ब्रिगेडच ओपन चॅलेंज
राज ठाकरे यांनी योगी यांना पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केल आहे. सोबतच त्यांनी या पत्रामध्ये महाराष्ट्र सरकारलासुद्धा टोला दिला आहे. योगी अदित्यनाथ यांना पाठवलेल्या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी लिहिलं आहे की,
” योगीजी आपण उत्तर प्रदेशातील मस्जिदींवरचे भोंगे खाली उतरवल्याबद्दल आपले अभिनंदन करतो. हीच बुद्धी महाराष्ट्र सरकारलासुद्धा यावी अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. मात्र महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’.”
अस पत्रामध्ये लिहत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
राज ठाकरे अंगाने मोठा भोंगा – अमोल मिटकरी
मंडळी नेहमी भारतीय जनता पक्षावर टीका करणारे राज ठाकरे अचानक भाजपचे गुणगान गाऊ लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेल आहे की ते आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षासोबत आपला धार्मिक अजेंडा घेऊन निवडणूका लढणार आहे.
पाठोपाठ सभा घेणे आणि शेती, शिक्षण, रोजगार यांसारखे मुद्दे न उचलता धार्मिक मुद्दे उचलणे यावरून राज ठाकरे यांचा राजकीय मनसुबा जनतेच्या चांगलाच लक्षात आलेला आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- माझ्यावरील हल्ल्यामध्ये पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुंडांना साथ – किरीट सोमय्या
- नेत्यांना किती सोपं असतं न बोलणं , भरडतो तो फक्त सामान्य
- राणा दाम्पत्याची अखेर माघार
- शरद पवारांना आम आदमी पक्षाच पत्र
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir