मंडळी राजकीय क्षेत्राचा इतिहास जर आपण बघितला तर सर्व राजकीय नेत्यांमध्ये सगळ्यात मोठं नाव म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे. ८० ते ९० च्या दशकामध्ये महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे हे एक मसिहा म्हणूनच आले होते.
अस म्हणायला हरकत नाही. त्यांच्याविरोधात विरोधीपक्षाचा नेतासुद्धा बोलायला विचारच करायचा. बाळासाहेब ठाकरेंचा चाहता वर्ग हा मुंबईतच नव्हे तर सम्पूर्ण भारतीय देशात प्रचंड प्रमाणात होता आणि आतासुद्धा आहे.
जेव्हा गडकरी- फडणवीस वादाचा झाला होता गौप्यस्फोट
महाराष्ट्रात खासकरून त्यांच्या नावाचा दरारा होता. कुठलंही पद नसतांना राजकिय क्षेत्रात त्यांच विषेशकरून चांगलच वजन होत. मात्र हे सगळं लक्षात घेता बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री का बरं झाले नाही?
२०१९ ला त्यांचेच सुपूत्र शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मग बाळासाहेब ठाकरे का बरं झाले नाही मुख्यमंत्री? हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला उपस्थित होत असेल.
तर मंडळी झालं असं की, बाळासाहेब ठाकरे नेहमी आपल्या मुलाखतीमध्ये, समाज माध्यमांवर सांगायचे की मला कधीच कुठलं पद घ्यायचं नाही. सत्ता कुणाचीही असो सत्तेच रिमोट मात्र आपल्या हातात असायला हवं. अस त्यांचं म्हणणं होतं. १९९५ ला बाळासाहेबांच्या शिवसेनेच युतीच सरकार स्थापन झालं. तेव्हापण ते मुख्यमंत्री झाले नाहीत.
उध्दव ठाकरेंचा राजीनामा आणि राज ठाकरे म्हणाले ” एखादा माणूस…”
मुख्यमंत्री न होण्यामागचं सर्वात मोठं कारण…
मंडळी अस म्हणतात की, बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य मराठी माणसांच्या हक्कासाठी जो संघर्ष केला त्यादरम्यान त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्यामुळे दाखल झालेले गुन्हे जर कोर्टात सिद्ध झाले तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल. या कारणाने त्यांनी मुख्यमंत्री पद नाकारलं अस म्हटल्या जात. १९८७ मध्ये झालेल्या एका पोटनिवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंवर धर्माच्या नावावर जनतेला मतं मागितल्याचे आरोप झाले होते.
या खटल्याचा निकाल १९९९ ला लावण्यात आला होता. ज्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ६ वर्ष मतदान न करण्याची सक्ती आणल्या गेली होती.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे आणि तो खून
- जेव्हा बाळासाहेबांना पवारांनी मातोश्री सोडायला सांगितल…
- प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ?
- शिवसेना संपणार ??
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir