मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येला जाण्यासाठी निघणार असून आतापासूनच त्यांच्या आगमनाची उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. राज ठाकरे यांनी गुडीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत अजाण आणि हनुमान चाळीसाचा मुद्दा उचलून धरला आहे.
ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर राज ठाकरेंच्याच नावाची चर्चा सुरू आहे. नेहमी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपली भूमिका मांडणारे राज ठाकरे अचानक भाजपची बाजू घ्यायला लागल्याने भाजप आणि मनसे अशी युती भविष्यात होणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.
ब्रुजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंविरोधात “आण रे तो पीडित” ट्रेंड
मात्र राज ठाकरे यांनी कितीही भाजपचे गुणगान गायले तरी उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मगितल्याशिवाय अयोध्येत पाय टाकू देणार नाही अशी धमकी दिली आहे.
ते प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हणाले की,
” महाराष्ट्रातील लोकांशी आमच कुठल्याही प्रकारच वैर नाही. जर कुणी महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये आला आणि त्याला हॉटेलमध्ये जागा मिळाली नाही, तर आम्ही त्याला आमच्या घरी राहू देऊ. मात्र राज ठाकरेंना कधीच नाही आणि त्यांना अयोध्येत आणणारा आजपर्यंत कुणी जन्माला आला नाही.”
अस म्हणत ब्रुजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना विरोध केला आहे.
जोपर्यंत राज ठाकरे मनसे कार्यालयात येत नाही तोपर्यंत मीसुद्धा तिथे जाणार नाही – वसंत मोरे
एकीकडे यूपीच सरकार राज ठाकरेंचं स्वागत करीत आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचेच खासदार ब्रुजभूषण सिंह त्यांचा विरोध करत आहे. मात्र चिघळलेलं हे प्रकरण कुठल्या वळणावर जाईल यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.
- राणा दाम्पत्य आणि संजय राऊत लडाखच्या थंड हवेत
- महिलांवर हात उचलाल तर हात तोडून हातात देऊ, सुप्रिया सुळे चा भाजपाला दम
- राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीच पत्र
- संदीप देशपांडे बद्दल माहिती द्या आणि ५० हजार घेऊन जा – भीम आर्मी
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .
Facebook : PoliticalWazir