मंडळी सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत चिघळत चाललं आहे. केंद्र सरकार आणि राज्यसरकार म्हणजे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार अस राजकीय युद्ध सद्धया महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची डबल ढोलकी असते, अस ते म्हणाले. त्यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांवर बोलताना कोल्हापूर निवडणूकीच्या अनुषंगाने खोचक टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली.
ते म्हणाले,
“तुम्ही कोल्हापूर शहरात आला तर विकास निधी वाढेल. त्याचा गावांच्या विकासासाठी फायदा होईल. अस आम्ही गेल्या पाच वर्षात इथल्या गावांना सांगितलं परंतु या गावांनी ऐकलं नाही.”
अस ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी पुढे बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ते म्हणाले की,
” जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची नेहमी डबल ढोलकी असते. जिल्हा परिषदेची निवडणूक आली शहरात येणार नाही म्हणून सांगतात आणि पालिकेची निवडणूक आली की हद्दवाढीची मागणी करतात.”
अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मात्र आता यावर महाविकास आघाडीमधील नेते काय प्रतिक्रिया देतील यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.