अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा वचननामा!
देशाचं राजकारण एका बाजूला आणि महाराष्ट्राचं राजकारण एका बाजूला आशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात अनेक घडामोडी घडल्या आणि राजकारणात टिकुन राहाण्यासाठी अस्तित्वाची लढाई चालू झाली.
लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकुन आपल्या अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्राची लूट थांबवणे, रोजगारनिर्मिती आणि शेतकरी कर्जमाफी यावर या जाहीरनाम्यात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ठाकरेनी या जाहीरनाम्याला ‘वचननामा’ असे नाव दिले आहे.
ठाकरे म्हणाले की,
“गुजरातमध्ये हलवण्यात आलेले आर्थिक शहर महाराष्ट्रात बांधले जाईल, ज्यामुळे राज्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील”.
याच बरोबर ठाकरे यांच्या वचननाम्यात शेतकरी वर्ग, उद्योगधंदे, आरोग्य व्यवस्था,जीएसटी करप्रणाली यांसंबंधी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच ठाकरे यांनी अपला जाहीरनामा प्रसिध्द करताना भाजपा वर सडकून टिका सुद्दा केली.
ठाकरेंच्या वचननाम्यातील महत्त्वाचे मुद्दे..
- संविधानाचं रक्षण करणं, हे आमचं प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी आम्ही काम करणार.
- गिफ्ट सिटी गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राची स्थापना स्थापन करणार.
- महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात जाऊ नयेत, यासाठी इतर राज्यांपेक्षा चांगल्या उद्योगस्नेही योजना आणि सुविधा देणार.
- राज्यात आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार.
- बेरोजगारी, शेतकरी, महिला, उद्योग या मूलभूत मुद्द्यांवर आम्ही काम करणार.
- शेतकऱ्यांना लागणारी खतं, बी-बियाणं जीएसटीमुक्त करणार.
- शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.
- आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून अधिक वाढविण्यासाठी आग्रही राहणार.
- देशात हुकूमशाही आणि एकाधिकारशाही माजू नये म्हणून संघराज्य पद्धती अधिक बळकट करू.
- सध्या सुरू असलेल्या कर वसुली प्रणालीत सुधारणा करणार.
- शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, जंतूनाशक औषधे, खते, औजारे इत्यादींवरील जीएसटी मुक्त करणार.
- शेती व शेतकरी हिताय पीकविमा योजनेचे पुनर्वलोकन आणि सुधारणा करणार.
- किमान ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढील ५ वर्षे स्थिर ठेवणार.
याच बरोबर
“महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवले जात आहेत.आधी हिरे व्यापार पळवले, त्यानंतर क्रिकेटचा सामना, फिल्मफेअर कार्यक्रम अशा सर्वच गोष्टी पळवल्या जात आहेत. महाराष्ट्राचं वैभव लुटलं जात आहे. पण ही लूट आम्ही इंडिया आघाडी सरकार आल्यानंतर थांबवणार”
असल्याचा शब्द ठाकरेंनी या दिला आहे. आणि आशीर्वाद असू द्या असे जनतेला आवाहन देखील केले.
हे ब्लॉग तुम्ही वाचले का ?